रणबीर कपूरने फोटोग्राफर्सची केली विचारपूस, तरीही भडकले नेटिझन्स, हे आहे कारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 19:03 IST2021-04-06T19:02:26+5:302021-04-06T19:03:21+5:30
रणबीरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्स भडकले आहेत.

रणबीर कपूरने फोटोग्राफर्सची केली विचारपूस, तरीही भडकले नेटिझन्स, हे आहे कारण
रणबीर कपूरला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. पण आता तो पूर्णपणे बरा झाला असून त्याला नुकतेच मुंबईतील एका क्लिनिकच्या बाहेर पाहाण्यात आले.
रणबीरला पाहाताच फोटोग्राफर्सने त्याचे फोटो काढण्याचा प्रयत्न केला. रणबीर हा मीडिया फ्रेंडली असल्याने त्याने देखील फोटोग्राफर्सना फोटो काढायला दिले. रणबीर फोटो काढून देत असला तरी काही फोटोग्राफर्स त्याला जवळ येऊन फोटो काढण्याविषयी सांगत होते. पण रणबीरने दूरूनच फोटो काढून दिले आणि तो निघून गेला.
रणबीरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्स फोटोग्राफरवर भडकले आहेत. मुंबईत दिवसाला 11 हजाराहून अधिक रुग्ण मिळून देखील तुम्ही जवळ यायला सांगता... असा प्रश्न नेटिझन्स सोशल मीडियाद्वारे विचारत आहेत.
रणबीर आता फिट दिसत असून तो आजारातून पूर्णपणे बरा झाला आहे. त्याच्यानंतर त्याची प्रेयसी अभिनेत्री आलिया भटला देखील कोरोनाची लागण झाली असून ती घरीच उपचार घेत आहे.