‘संजू’च्या यशाने वाढली रणबीर कपूरची ‘ब्रँड व्हॅल्यू’! दुप्पट केली फी!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 01:53 PM2018-07-25T13:53:23+5:302018-07-25T13:56:49+5:30
होय, ३०० कोटींच्या क्लबमध्ये सामिल होणारा ‘संजू’ हा रणबीरचा पहिला चित्रपट ठरला. साहजिकच या एवढ्या मोठ्या यशानंतर रणबीरची मागणी वाढली आहे
रणबीर कपूरचा नुकताच रिलीज झालेला ‘संजू’ सुपरडुपर हिट झाला. या चित्रपटाने संजय दत्तची ‘इमेज’ बदलल्यास मदत झाली. (अर्थात हा आमचा दावा नाही) त्याहीपेक्षा रणबीर कपूरची ‘ब्रँड व्हॅल्यू’ वाढण्यासही मदत झाली. होय, ३०० कोटींच्या क्लबमध्ये सामिल होणारा ‘संजू’ हा रणबीरचा पहिला चित्रपट ठरला. साहजिकच या एवढ्या मोठ्या यशानंतर रणबीरची मागणी वाढली आहे आणि हे पाहून रणबीरनेही वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याची संधी साधली आहे. ताजी बातमी खरी मानाल तर रणबीरने आपली ब्रँड एंडोर्समेंट फी सरसकट दुप्पट केली आहे.
रणबीर तरूणाईत प्रचंड लोकप्रीय आहे. गेल्या काही वर्षांत त्याचे अनेक चित्रपट आले तसे आपटलेत. पण त्याची लोकप्रीयता कमी झाली नाही. ‘संजू’ सुपरहिट झाला आणि ही लोकप्रीयता आणखी कित्येकपटींनी वाढली. साहजिकचं अनेक बड्या ब्रँडमध्ये रणबीरला साईन करण्याची चढाओढ सुरु आहे. पण आता रणबीर आपल्या प्रोजेक्ट्सबद्दल अधिक सावध झाला आहे. रणबीरने काय करावे अन् काय करू नये, याबाबत त्याची टीम अगदी स्पष्ट आहे. त्यामुळे येत्या काळात रणबीर अनेक कमिर्शिअल शूट करताना दिसेल.
रणबीर कपूर स्टारर ‘संजू’ बॉलिवूड बॉक्सआॅफिसवर सर्वाधिक कमाई करणारा पाचवा चित्रपट बनला आहे. पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने १०० कोटी कमावून विक्रम रचला. अद्यापही या चित्रपटाची बॉक्सआॅफिसवरची घोडदौड सुरूच आहे.