रणबीर कपूर पुन्हा एकदा पापाराझींवर भडकला, असभ्य वर्तन पाहून नेटकऱ्यांनी धरलं धारेवर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 12:44 PM2023-11-09T12:44:19+5:302023-11-09T13:10:53+5:30
Animal सिनेमाच्या प्रमोशनल इव्हेंटनंतर पापाराझी रणबीर कपूरला पोज देण्यास सांगत होते.
अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या Animal सिनेमाच्या तयारित आहे. 'तू झुठी मै मक्कार' च्या यशानंतर त्याला Animal सिनेमाकडून अपेक्षा आहेत. तसंच सिनेमाबाबतीत चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. टीझरनंतर चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. दरम्यान Animal सिनेमाच्या इव्हेंटमध्ये रणबीर कपूर पापाराझींवर भडकला. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. नक्की झालं तरी कायल बघुया.
Animal सिनेमाच्या प्रमोशनल इव्हेंटनंतर पापाराझी रणबीर कपूरला पोज देण्यास सांगत होते. सोबतच त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या. तेव्हा रणबीर अचानक भडकला आणि म्हणाला,'काय करु भाई, काय करु?' रणबीरचं हे वर्तन नेटकऱ्यांना अजिबातच पटलं नाही. त्यांनी कमेंट्स सेक्शनमध्ये अभिनेत्याला चांगलंच धारेवर धरलंय.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर भरभरुन कमेंट्स आल्या आहेत. यामध्ये रणबीर कपूरचं असभ्य वर्तन नेटकऱ्यांना पटलेलं नाही. 'आरके किती असभ्य आहे' अशी कमेंट एकाने केलीए. मात्र व्हिडिओत नंतर रणबीर एका चाहतीला शांततेत सेल्फीही देताना दिसतोय.
रणबीर कपूरचा 'Animal' हा सिनेमा १ डिसेंबर रोजी रिलीज होत आहे. यामध्ये रश्मिका मंदाना त्याच्या अपोझिट आहे तर अनिल कपूरने त्याच्या वडिलांचा रोल केला आहे. तर बॉबी देओल खतरनाक व्हिलनच्या भूमिकेत आहे. 'कबीर सिंग' फेम दिग्दर्शक संदीप वांगा रेड्डी यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.