Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 03:52 PM2024-11-25T15:52:50+5:302024-11-25T15:53:24+5:30

रणबीर कपूरनेही केलं मान्य, पण म्हणाला...

Ranbir Kapoor reaction on Animal movie bad impact on society talks at Goa IFFI | Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."

Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."

अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) नुकताच गोवा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाला होता. यावेळी त्याने पॅनल डिस्कशनमध्ये अनेक विषयांवर चर्चा केली. आजोबा राज कपूर यांचं सिनेइंडस्ट्रीत असलेलं योगदान अधोरेखित केलं. आयकॉनिक कलाकारांचा आपल्याला विसर पडला नाही पाहिजे असंही तो म्हणाला. दरम्यान रणबीरला त्याच्या 'अॅनिमल' सिनेमावर झालेल्या टीकेविषयी विचारलं. त्यावर तो काय म्हणाला वाचा.

'इफ्फी'सोहळ्यातरणबीर कपूरला प्रश्न विचारण्यात आला की 'अॅनिमल' सारख्या सिनेमांमुळे समाजावर वाईट परिणाम होतोय का? यावर रणबीर स्पष्टीकरण देत म्हणाला, "मी तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. एक अभिनेता म्हणून आमचं हे कर्तव्यच आहे की आण्ही समाजावर सकारात्मक परिणाम करणारे चित्रपट करु. पण हेही तितकंच सत्य आहे की मी एक अभिनेता आहे आणि मला विविधांगी भूमिका करायला मिळाव्या हे माझ्यासाठी गरजेचे आहे. पण तुम्ही म्हणत आहात तेही सत्यच आहे. आम्ही जो सिनेमा बनवत आहोत त्याप्रती आम्हाला आणखी जबाबदारीने वागावं लागले."
 
रणबीर कपूरने 'अॅनिमल' मध्ये केलेले काम पाहून सगळेच चकित झाले होते. त्याचा अभिनय अप्रतिमच होता मात्र सिनेमाचा विषय, काही दृश्य, संवाद हे लोकांच्या पचनी न पडणारं होतं. तसंच यामुळे चुकीचा मेसेज जात होता. 'अॅनिमल'बरीच टीका झाली होती. संदीप रेड्डी वांगा यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं.

Web Title: Ranbir Kapoor reaction on Animal movie bad impact on society talks at Goa IFFI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.