'जुते ले लो, पैसे दे दो..' मेहुणींनी रणबीरकडून लग्नात बुट पळवण्याचे घेतले इतके रुपये? अभिनेत्यानं केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2024 16:22 IST2024-03-31T16:18:47+5:302024-03-31T16:22:42+5:30
रणबीर कपूरने आई नीतू कपूर आणि बहीण रिद्धिमा साहनीसोबत कपिल शर्माचा शो 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये हजेरी लावली.

'जुते ले लो, पैसे दे दो..' मेहुणींनी रणबीरकडून लग्नात बुट पळवण्याचे घेतले इतके रुपये? अभिनेत्यानं केला खुलासा
'हम आपके है कौन' (Hum aapke hai kaun) हा चित्रपट सर्वार्थाने एक हिट चित्रपट होता. अजूनही तो चित्रपट तेवढ्याच कौतूकाने पाहिला जातो. या चित्रपटात दाखवण्यात आलेला नवरदेवाचे बूट चोरण्याचा प्रसंग आणि त्यानंतर नवरीच्या बहिणींनी त्याच्याकडून केलेली पैशांची वसूली हा तर एक ट्रेण्ड होऊन बसला आहे. सामान्य नागरिक असो किंवा सेलिब्रेटी जवळपास प्रत्येक लग्नातला तो एक सगळ्यात मुख्य इव्हेंट झाला आहे. नुकतेच अभिनेता रणबीर कपूरने बुट चोरल्यानंतर मेहुणींनी लग्नात किती पैसे दिले, याचा खुलासा केला आहे.
रणबीर कपूरने आई नीतू कपूर आणि बहीण रिद्धिमा साहनीसोबत कपिल शर्माचा शो 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये हजेरी लावली. यावेळी त्यानं अनेक गोष्टीचा खुलासा केला. यावेळी कपिल शर्माने रणबीरला प्रश्न केला की, लग्नात बुट चोरल्यानंतर मेहुणींना 11-12 कोटी रुपये दिले होते का? यावर ती म्हणाली, 'आलियाच्या बहिणींनी कधीच करोडो रुपये मागितले नव्हते. त्यावेळी त्यांनी माझ्याकडे काही लाख रुपये मागितले. पण मी त्यांच्याशी बार्गनिंग करुन त्यांना काही हजारांवर आणलं. त्यानंतर काही हजार रुपये मी त्यांना दिले. आमचं लग्न घरीच झालं, त्यामुळे त्यांनी बुट दिले जरी नसत्त री मी घरीच राहिला असतो'.
रणबीर कपूरने 14 एप्रिल 2022 रोजी आलिया भट्टसोबत लग्न केलं होतं. आलिशान भव्य लग्नाऐवजी या जोडप्याने कुटुंबीय आणि जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत घरातच लग्नगाठ बांधली होती. या जोडप्याला 6 नोव्हेंबर 2022 मध्ये 'राहा' ही मुलगी झाली. तिचं कपूर कुटुंबाचे सर्वगुण तिच्यात आलेले स्पष्ट दिसतात. गोरी त्वचा, निळेशार डोळे यामुळे तिच्यात आजोबा ऋषी कपूर यांचीही झलक दिसते असं म्हणतात. राहाला सध्या सगळीकडूनच खूप प्रेम मिळत आहे.