कपूर घराण्याची सून होण्यासाठी आलियाला सोडावी लागली 'ही' सवय, रणबीरनेच केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2024 15:03 IST2024-07-28T15:03:05+5:302024-07-28T15:03:54+5:30
मिसेस कपूर होण्याआधी आलियाने रणबीरसाठी तिची एक सवय सोडल्याचं अभिनेत्यानं सांगितलं.

कपूर घराण्याची सून होण्यासाठी आलियाला सोडावी लागली 'ही' सवय, रणबीरनेच केला खुलासा
Ranbir Kapoor - Alia Bhatt : आलिया भट ही बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. विविधांगी भूमिका साकारून आलियाने तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली. फॅशन आयकॉन म्हणून ती ओळखल्या जाते. बॉलिवूडमध्ये अनेक हीट सिनेमे दिल्यानंतर आलियानं स्वप्नातील राजकुमार असलेल्या रणबीरशी लग्न केलं आणि ती कपूर घराण्याची सून झाली. लग्नाआधी आणि लग्नानंतर आलियाचं आयुष्य फार बदलेलं आहे. आलियाच्या वागण्या-बोलण्यात झालेला प्रचंड बदल तिच्या चाहत्यांना देखील जाणवला. नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत रणबीने आलियाबद्दल मोठा खुलासा केला.
मिसेस कपूर होण्याआधी आलियाने रणबीरसाठी तिची एक सवय सोडल्याचं अभिनेत्यानं सांगितलं. आलिया आणि वैवाहिक जीवनाबद्दल 'पीपल विथ WTF' पॉडकास्टमध्ये निखिल कामथशी बोलताना रणबीर म्हणाला, 'लग्न झाल्यावर आपल्याला दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी व सवयींमध्ये बदल करावा लागतो. आपलं मूळ व्यक्तिमत्त्व बाजूला सारून विचार करावा लागतो. आलिया आणि माझं सुद्धा असंच आहे. प्रत्येक गोष्टीत एकमेकांना जास्तीत जास्त समजून घेण्याचा आमचा प्रयत्न असतो. याचं उदाहरण सांगायचं झालं तर, पुर्वी आलिया खूप मोठ्या आवाजात बोलायची. माझे वडील सुद्धा आमच्याशी तसेच बोलायचे. त्या मोठ्या आवाजाचा मला त्रास व्हायचा. तिला सगळं समजल्यावर आलियाने मोठ्या आवाजात बोलणं पूर्णपणे कमी केलं'.
पुढे तो म्हणाला, 'जेव्हा तुम्ही वयाची ३० वर्षे असे वागत असता आणि अचानक तुम्हाला कोणीतरी बदल करायला सांगतो. तेव्हा निश्चितपणे तो बदल करणं फार अवघड जातं. पण, तिने माझ्यासाठी तो बदल केलाय. आलिया माझ्यासाठी बदलली. मी सुद्धा तिच्यासाठी बदलण्याचा प्रयत्न करतोय. तिच्याकडे पाहून मलाही नेहमीच आपणही बदललं पाहिजे आणि तिला हवं तसं वागलं पाहिजे, असं वाटतं', असं रणबीर कपूरने सांगितलं.
रणबीर-आलिया नेहमीच एकमेकांना खंबीरपणे साथ देताना दिसतात. या दोघांना राहा नावाची गोंडस मुलगी आहे. जवळपास ५ वर्षे डेट केल्यावर दोघांनी एप्रिल २०२२ मध्ये लग्न केलं होतं. 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आलिया-रणबीरमध्ये खूप चांगली मैत्री झाली. यानंतर या मैत्रीचं रुपांतर पुढे प्रेमात झालं. या जोडप्यामध्ये जवळपास १० वर्षांचं अंतर आहे. आलिया रणबीरपेक्षा वयाने लहान आहे. तरीही दोघांमध्ये जबरदस्त बॉन्डिंग आहे. दोघेही अनेकदा कपल गोल्स देताना पाहायला मिळतात.