रणबीर कपूरला नाही ‘या’ गोष्टीचा पश्चाताप!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 12:15 PM2018-08-13T12:15:57+5:302018-08-13T12:16:12+5:30

रणबीर कपूरचा नुकताच रिलीज झालेला ‘संजू’ हा चित्रपट बराच गाजला. या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर अनेक विक्रम नोंदवलेत. पण त्याआधी याच बॉक्सआॅफिसने रणबीरची बरीच कठोर परीक्षा घेतली. 

Ranbir Kapoor says he doesn’t regret being a part of these movies | रणबीर कपूरला नाही ‘या’ गोष्टीचा पश्चाताप!

रणबीर कपूरला नाही ‘या’ गोष्टीचा पश्चाताप!

googlenewsNext

रणबीर कपूरचा नुकताच रिलीज झालेला ‘संजू’ हा चित्रपट बराच गाजला. या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर अनेक विक्रम नोंदवलेत. पण त्याआधी याच बॉक्सआॅफिसने रणबीरची बरीच कठोर परीक्षा घेतली. अगदी डेब्यू चित्रपटापासून अनेकदा रणबीरला या परीक्षेतून जावे लागले. खरे तर रणबीरने संजय लीला भन्साळींच्या ‘सावरियां’मधून डेब्यू केला होता. हे रणबीरचे ग्रॅण्ड लॉन्चिंग होते. पण पहिल्या चित्रपटाने रणबीरची अपयशाशी ओळख करूल दिली. गतवर्षी आलेला ‘जग्गा जासूस’ हा रणबीरचा चित्रपटही तसाच दणकून आपटला. याशिवाय ‘बॉम्बे वेल्वेट’ हा रणबीरचा चित्रपटही तसाच फ्लॉप ठरला. रणबीरच्या नव्या नव्या करिअरमधे तीन मोठे सिनेमे फ्लॉप झाल्याने कपूर कुटुंबाची चिंता वाढली होती. रणबीरचे पापा ऋषी कपूर तर प्रचंड बिथरले होते. लेकाच्या फ्लॉप चित्रपटांचे खापर त्यांनी सरळ-सरळ या चित्रपटांच्या दिग्दर्शकांच्या माथ्यावर फोडले होते. पण रणबीर एकदम ‘कूल’ होता. आजही या फ्लॉप चित्रपटांबद्दल त्याच्या मनात कुठलाही पश्चाताप नाही. आजपर्यंतच्या कारकिर्दीत मी जे काही चित्रपट केलेत, त्यापैकी एकाही चित्रपटाबद्दल मला पश्चाताप नाही. मी हा एक चित्रपट करायला नको होता, असा विचार माझ्या मनात चुकूनही कधी आला नाही. सावरियां, जग्गा जासूस, बॉम्बे वेल्वेट हे चित्रपट माझ्या करिअरचा भाग आहेत आणि नेहमी राहतील. आपली मुलं करिअरमध्ये अपयशी ठरलीत तर आपण त्यांना नाकारत नाहीत. हे सिनेमेही माझ्यासाठी माझ्या अपत्यांसारखी आहेत. ते अपयशी ठरलेत म्हणून मी त्यांना अव्हेरणार नाहीच. प्रत्येक चित्रपटाने मला घडवले आहे. प्रत्येक चित्रपटाने माझ्यातील कलाकाराला प्रगल्भ केले आहे, असेही रणबीर या चित्रपटांबद्दल म्हणाला.
सध्या रणबीर व आलिया भट्ट यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा जोरात आहेत. आलिया नीतू सिंग यांनाही पसंत असल्याचेही कानावर येतेय. आलियाआधी रणबीर कॅटरिना कैफसोबत सीरिअस रिलेशनशिपमध्ये होता. पण अचानक त्यांचे ब्रेकअप झाले होते. कॅटरिनापूर्वी दीपिका पादुकोण रणबीरच्या आयुष्यात होती

 

Web Title: Ranbir Kapoor says he doesn’t regret being a part of these movies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.