रणबीर- श्रद्धा कपूरच्या चित्रपटाच्या सेटवर राडा, थांबवावं लागलं शूटिंग?; नेमकं काय घडलं वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 04:55 PM2022-03-16T16:55:58+5:302022-03-16T16:56:22+5:30

मुंबईतील रॉयल पाम्स येथे अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांची प्रमुख भूमिका असलेल्या दिग्दर्शक लव रंजन यांच्या आगामी चित्रपटाच्या सेटवर मंगळवारी कामगारांनी जोरदार राडा घातला.

Ranbir kapoor starrer luv ranjan untitled film shooting halts in mumbai after workers create strom on the set over non payment | रणबीर- श्रद्धा कपूरच्या चित्रपटाच्या सेटवर राडा, थांबवावं लागलं शूटिंग?; नेमकं काय घडलं वाचा...

रणबीर- श्रद्धा कपूरच्या चित्रपटाच्या सेटवर राडा, थांबवावं लागलं शूटिंग?; नेमकं काय घडलं वाचा...

googlenewsNext

मुंबईतील रॉयल पाम्स येथे अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांची प्रमुख भूमिका असलेल्या दिग्दर्शक लव रंजन यांच्या आगामी चित्रपटाच्या सेटवर मंगळवारी कामगारांनी जोरदार राडा घातल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे चित्रपटाचं शुटिंग देखील थांबवावं लागलं आहे. चित्रपटाच्या गाण्याच्या शूटिंग दरम्यान कामगारांनी गोंधळ घातला आणि काम बंद पाडले. पाच महिन्यांहून अधिक काळ त्यांचं मानधन दिलेलं नसल्याचं कामगारांचं म्हणणं आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये कांदिवलीच्या चारकोप परिसरात शूट करण्यात आलं, या चित्रपटासाठी कामगारांनी एक सेट उभारला होता. पाच महिन्यांहून अधिक काळापासूनचं त्याचं मानधन रोखून धरल्याचा रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांचा आरोप आहे. 

सेटवर पोहोचलेल्या कामगारांचा गोंधळ पाहून पोलिसांना पाचारण करण्यात आले. कामगारांना आरे पोलीस ठाण्यात नेण्यात आले आणि नंतर फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) चे अधिकारीही पोहोचले आणि कामगारांची बाजू समजून घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांना परत पाठवलं. जिथं कामगारांचे पैसे थकवले जात आहेत. तिथं स्वत: कामगारच काम थांबवत आहेत, असं एफडब्ल्यूआयसीईचे अध्यक्ष बीएन तिवारी म्हणाले. 

नेमकं प्रकरण काय?
यापूर्वीही असं घडलं आहे. निर्माते कर्मचाऱ्यांचं मानधन का देत नाहीत?  FWICE यात मध्यस्थी करेल आणि कामगारांचे पैसे मिळवेल. 'लव फिल्म्स'नं दीपंकर दास गुप्ता यांना या चित्रपटाचा सेट लावण्याचं कंत्राट दिलं होतं आणि त्यांना पूर्ण पैसेही दिले होते, असा आरोप आहे. दीपंकर दास गुप्ता यांनी हा प्रकल्प एका कंपनीला आउटसोर्स केला होता, जिथून दोन लोकांनी दीपंकर दास गुप्ता यांच्याशी करार केला होता. या कंपनीने नंतर ते दुसऱ्याला आऊटसोर्स केले आणि कामगारांचे 1 कोटी 22 लाख रुपये यात अडकले.

फिल्म स्टुडिओ सेटिंग आणि अलाईड मजदूर युनियनचे सरचिटणीस गणेशवरलाल श्रीवास्तव यांनी याबाबत तक्रार केली होती. तक्रारीच्या उत्तरात लव फिल्म्सने FWICE आणि इतर युनियन्सना पत्र पाठवलं. यात सर्व आवश्यक पेमेंट दिल्यानं ते कोणत्याही नॉन-पेमेंटसाठी जबाबदार नाहीत, असं म्हटलं होतं. या संदर्भात नियुक्त केलेले प्रॉडक्शन डिझायनर दीपंकर दास गुप्ता यांनी सांगितले की, 'जर ही माझी चूक असेल, तर मी लवसोबत शूटिंग करेन का? खरंतर मी रणबीर-श्रद्धा कपूर एकाच सेटवर आहोत. एफडब्ल्यूआयसीईचे सरचिटणीस अशोक दुबे यांचे याबाबत म्हणणे आहे की, गरीब कामगार आता सँडविच झाले आहेत. हा आऊटसोर्सिंग व्यवसाय बंद झाला पाहिजे. उत्पादकांकडून कामगारांना थेट पगार का दिला जात नाही? काम करण्याच्या या पद्धतीमुळे कामगारांवर प्रचंड ताण येतो. यापूर्वीही असं घडलं आहे आणि यापुढेही होईल.

Web Title: Ranbir kapoor starrer luv ranjan untitled film shooting halts in mumbai after workers create strom on the set over non payment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.