THROWBACK : फोटोत रडणारा ‘हा’ चिमुकला आज आहे बॉलिवूडचा सुपरस्टार, तुम्ही ओळखलंत का त्याला?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 08:00 AM2022-03-12T08:00:00+5:302022-03-12T08:00:07+5:30

THROWBACK : फोटोत रडणाऱ्या या चिमुरड्याला ओळखलंत? आज तो बॉलिवूडचा मोठा स्टार आहे. तरूणींच्या गळ्यातील ताईत आहे आणि एक टॉपची अभिनेत्री त्याच्या प्रेमात आकंठ बुडालीये.

ranbir kapoor THROWBACK childhood photo going viral on internet | THROWBACK : फोटोत रडणारा ‘हा’ चिमुकला आज आहे बॉलिवूडचा सुपरस्टार, तुम्ही ओळखलंत का त्याला?

THROWBACK : फोटोत रडणारा ‘हा’ चिमुकला आज आहे बॉलिवूडचा सुपरस्टार, तुम्ही ओळखलंत का त्याला?

googlenewsNext

फोटोत रडणाऱ्या या चिमुरड्याला ओळखलंत? आज तो बॉलिवूडचा मोठा स्टार आहे. तरूणींच्या गळ्यातील ताईत आहे आणि एक टॉपची अभिनेत्री त्याच्या प्रेमात आकंठ बुडालीये. सोशल मीडियावर बॉलिवूड सेलिब्रिटींच्या बालपणीचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. या गर्दीत या चिमुरड्याचा फोटोही तुफान व्हायरल होतोय. फोटोत त्याचा रडणारा चेहराही कमालीचा क्यूट दिसतोय.

अद्यापही तुम्ही या चिमुरड्याला ओळखू शकला नसाल तर आम्ही सांगतो. हा दुसरा कुणी नसून बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आहे. होय, नीतू कपूर यांचा लाडका लेक आणि आलिया भटचा रिअल लाईफ हिरो.

रणबीरचे बालपणीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हा फोटो त्यातलाच एक. रणबीर सोशल मीडियावर नाही. पण रणबीरची आई नीतू कपूर सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. रणबीर व लेक रिद्धिमाचे  अनेक थ्रोबॅक फोटो त्या शेअर करत असतात.
सध्या रणबीर कपूर आलियाला डेट करतोय. लवकरच हे कपल लग्न करणार असं मानलं जातंय. ‘ब्रह्मास्त्र’च्या सेटवर रणबीर व आलिया एकमेकांच्या प्रेमात पडले. आता हे नातं लग्नापर्यंत येऊन पोहोचलं आहे. 

खरं तर रणबीरला बॉलिवूडचा प्लेबॉय म्हटलं जातं. याला कारणही तसंच आहे. आलिया आयुष्यात येण्याआधी रणबीर कतरिना कैफच्या प्रेमात होता. अगदी तिच्यासोबत तो लिव्ह इनमध्येही राहिला. पण आईला कॅट पसंत नव्हती. तिच्या मर्जीखातर म्हणा वा अन्य कुठल्या कारणाने रणबीर हळूच कतरिनाच्या आयुष्यातून निघून गेला. त्याआधी रणबीर दीपिकाच्या प्रेमात होता.

दीपिका आणि रणबीर कपूरच्या प्रेमाच्या चर्चा तर आजही होतात. ‘बचना ए हसीनो’ चित्रपटादरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. दीपिका तर रणबीरसाठी अक्षरश: वेडी होती. पण अचानक दोघांचं ब्रेकअप झालं.  याशिवाय अवंतिका मलिक, अमीषा पटेल, नर्गिस फाखरी, फॅशन डिझाईनर नंदिता महतानी, श्रुती हासन यांच्यासोबतही त्याच्या अफेअरच्या चर्चा कधीकाळी जोरात होत्या. पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिच्यासोबतही रणबीरचे नाव जोडलं गेलं होतं. 

Web Title: ranbir kapoor THROWBACK childhood photo going viral on internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.