Ranbir Kapoor : रणबीर कपूरचा राग अनावर, चाहत्याचा 'मोबाईल'च फेकला; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 01:43 PM2023-01-27T13:43:09+5:302023-01-27T13:45:59+5:30

रागात मोबाईल फेकताच त्या मुलाचा चेहरा बघण्यासारखा आहे. नेटकरी तर या व्हिडिओची चांगलीच मजा घेत आहेत.

ranbir kapoor throws fans mobile phone in anger is this ad shoot or real not confirmed yet | Ranbir Kapoor : रणबीर कपूरचा राग अनावर, चाहत्याचा 'मोबाईल'च फेकला; Video व्हायरल

Ranbir Kapoor : रणबीर कपूरचा राग अनावर, चाहत्याचा 'मोबाईल'च फेकला; Video व्हायरल

googlenewsNext

Ranbir Kapoor : बॉलिवुड अभिनेता रणबीर कपूरचे लाखो चाहते आहेत. त्याचे लुक्स आणि अभिनय नेहमीच चाहत्यांना प्रेमात पाडते. रणबीरला माध्यमांसमोर नेहमी शांत अंदाजात बघितलं जातं पण आता रणबीरचा एक असा व्हिडिओ समोर आलाय ज्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 

रणबीर कपूरची एक झलक पाहण्यासाठी फॅन्सची नेहमीच गर्दी होते. त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी चाहते आतुर असतात. नुकत्याच व्हायरल झालेल्या या व्हिडिओत रणबीर कपूरने जे केलंय ते बघून चाहत्यांना विश्वासच बसत नाहीए.व्हिडिओमध्ये एक मुलगा रणबीरसोबत फोटो काढण्यासाठी पुढे येतो. रणबीरही सेल्फी कॅमेऱ्यात बघत त्याला फोटो देत असतो. मात्र त्या मुलाच्या मोबाईलमध्ये काहीतरी प्रॉब्लेम येतो. मग तो मुलगा परत सेल्फी काढण्यासाठी मोबाईल धरतो. तर पुन्हा तेच घडतं. तिसऱ्या वेळेसही जेव्हा फोटो निघत नाही तेव्हा रणबीर त्या मुलाला मोबाईल मागतो. मुलाने मोबाईल देताच रणबीर चक्क तो मोबाईल मागे फेकून देतो.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. आता या व्हिडिओत रणबीर खरंच चिडलाय का की हे फक्त एखाद्या मोबाईलच्या जाहिरातीचं शूट आहे हे काही अजून समजू शकलेले नाही. मात्र रागात मोबाईल फेकताच त्या मुलाचा चेहरा बघण्यासारखा आहे. नेटकरी तर या व्हिडिओची चांगलीच मजा घेत आहेत. रणबीर बहुतेक चाहत्याला चांगला मोबाईल घेऊन देणार अशी कमेंट एकाने केली आहे.

रणबीर कपूर लवकरच 'तू झुठी मै मक्कार' या सिनेमात दिसणार आहे. यामध्ये तो आणि 'श्रद्धा कपूर' यांची फ्रेश जोडी आहे. तर याशिवाय रणबीरचा अॅनिमल हा सिनेमा देखील प्रदर्शित होणार आहे.

Web Title: ranbir kapoor throws fans mobile phone in anger is this ad shoot or real not confirmed yet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.