रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’चा रिलीजपुर्वीच विक्रम; शाहरुखच्या 'जवान'ला टाकले मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 11:53 AM2023-11-08T11:53:29+5:302023-11-08T11:58:44+5:30
अभिनेता रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ या चित्रपटाने प्रदर्शनापुर्वी एक विक्रम केला आहे.
बॉलिवूडचा सुपरस्टार म्हणून ओळखला जाणारा रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी ‘अॅनिमल’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा टीझर आणि गाण्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने प्रदर्शनापुर्वी एक विक्रम केला आहे. हा चित्रपट अमेरिकेतील 888 हून अधिक स्क्रीनवर प्रदर्शित होणार आहे. 'अॅनिमल' हा चित्रपट 1 डिसेंबरला पाच भाषांमध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
शाहरुख खानचा 'जवान' 850 स्क्रीन्सवर दाखवण्यात आला होता. तर आता रणबीरचा 'ब्रह्मास्त्र' 810 स्क्रीन्सवर दाखवण्यात येत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित होणारा ‘अॅनिमल’ हा पहिलाच हिंदी चित्रपट ठरला आहे. या चित्रपटात रणबीर कपूर एका अनोख्या स्टाईलमध्ये दिसत आहे.
‘अॅनिमल’ या गँगस्टर ड्रामा चित्रपटाची कथा वडील आणि मुलाच्या नात्याच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. टीझरमध्ये बॉबी देओलही अतिशय खतरनाक लूकमध्ये दिसत आहे. या चित्रपटात रणबीर आणि साऊथ स्टार रश्मिका मंदान्ना पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. ‘अॅनिमल’ची कथा व दिग्दर्शन ‘अर्जुन रेड्डी’ व ‘कबीर सिंग’सारखे चित्रपट देणारे संदीप रेड्डी वांगा यांनी केलं आहे.
काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअर बिलबोर्डवर 'अॅनिमल'चा टीझरही दाखवण्यात आला होता. टाइम्स स्क्वेअर हा अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील मिडटाउन मॅनहॅटन भागातील एक लोकप्रिय चौक आहे. हा जगातील सर्वात व्यस्त पादचारी रस्त्यांपैकी एक आ. जिथे असंख्य डिजिटल होर्डिंग्ज लावले आहेत. अमेरिकेत त्याला 'सेंटर ऑफ द युनिव्हर्स' असेही म्हणतात. हे जगातील मनोरंजन उद्योगाचे प्रमुख केंद्र देखील मानले जाते. आता अशा परिस्थितीत रणबीर कपूरचा 'अॅनिमल' किती धुमाकूळ घालतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.