'रामायण'साठी आधी नॉनव्हेज अन् दारू सोडली, आता श्रीरामाच्या भूमिकेसाठी रणबीर घेणार स्पेशल ट्रेनिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 12:45 PM2024-02-08T12:45:05+5:302024-02-08T12:45:42+5:30
प्रभू श्रीरामाच्या भूमिकेसाठी रणबीर खास ट्रेनिंग घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
नितेश तिवारींच्या रामायण या आगामी चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या सिनेमात बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर प्रभू श्रीरामाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या भूमिकेसाठी रणबीर कठोर मेहनतही करताना दिसत आहे. 'रामायण' सिनेमासाठी श्रद्धाभाव दाखवत रणबीरने दारू पिणं आणि नॉनव्हेज खाणं सोडलं होतं. आता प्रभू श्रीरामाच्या भूमिकेसाठी रणबीर खास ट्रेनिंग घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, नितेश तिवारी रामायण सिनेमाचं शूटिंग सुरू करण्यापूर्वी त्यासाठी कलाकारांकडून तयारी करून घेत आहेत. या सिनेमातील संवाद आमि व्हॉइस ओव्हरसाठी तिवारींनी वेगळी टीम बनवली आहे. एका एक्सपर्टकडून रणबीरलाही डायलॉग बोलण्यासाठी व्हॉइस ओव्हरचं ट्रेनिंग देण्यात येणार आहे. रणबीर साकारत असलेल्या श्रीरामाच्या भूमिकेला पूरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न नितेश तिवारींकडून केला जात आहे.
तर दुसरीकडे रणबीरही या भूमिकेसाठी कठोर मेहनत घेताना दिसत आहे. भगवान रामाच्या भूमिकेसाठी रणबीर तास न् तास डायलॉगची प्रॅक्टिस करत आहे. दरम्यान, रामायण हा नितेश तिवारींचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. सिनेमात रणबीर श्रीरामाची भूमिका साकारणार आहे. तर साई पल्लवी सीता मातेच्या भूमिकेत दिसणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, साऊथ सुपरस्टार यश रावणाच्या आणि सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे.