Ranbir Kapoor : मुलीच्या जन्माआधी टेन्शनमध्ये आला होता रणबीर कपूर, CAने दिला होता सल्ला; वाचा काय आहे किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 04:02 PM2023-02-28T16:02:36+5:302023-02-28T16:04:31+5:30

Ranbir Kapoor : रणबीरने लेक राहाबद्दल एक इंटरेस्टिंग खुलासा केला आहे.

ranbir kapoor told his ca asked to make will before daughter raha birth | Ranbir Kapoor : मुलीच्या जन्माआधी टेन्शनमध्ये आला होता रणबीर कपूर, CAने दिला होता सल्ला; वाचा काय आहे किस्सा

Ranbir Kapoor : मुलीच्या जन्माआधी टेन्शनमध्ये आला होता रणबीर कपूर, CAने दिला होता सल्ला; वाचा काय आहे किस्सा

googlenewsNext

रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) ‘तू झूठी मैं मक्कार’ (Tu Jhoothi Main Makkar) हा सिनेमा येत्या ८ मार्चला प्रदर्शित होतोय. सध्या रणबीर या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. यादरम्यान रणबीरने मुलाखतींचा धडाका लावला आहे आणि यानिमित्ताने एक ना अनेक खुलासेही होत आहेत. अशाच एका मुलाखतीत रणबीरने लेक राहाबद्दल एक इंटरेस्टिंग खुलासा केला. होय, राहाचं हसणं एकदम जादुई आहे. तिच्यामुळे घरातून पाय निघत नाही, असं तो म्हणाला. याआधी एका मुलाखतीत रणबीरने अशीच एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली होती. बायको प्रेग्नंट असताना मी टेन्शनमध्ये आलो होतो, असं तो म्हणाला होता. आता ही नेमकी काय भानगड आहे, ते जाणून घेऊ यात...

तर राहाच्या जन्माआधी रणबीरने कम्पॅनिअनला एक मुलाखत दिली होती. तू वडील होणार आहे, तेव्हा वडिलोपार्जित संपत्तीबद्दल काही विचार केला आहेस का, असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. यावर रणबीरने एक किस्सा शेअर केला होता. तो म्हणाला होता, ''जेव्हा बायको आलिया प्रेग्नेंट होती तेव्हा एक दिवस माझा सीए माझ्याजवळ आला. आपल्या इच्छापत्र बनवायला हवं का, असं त्याने मला विचारलं. त्यांचा प्रश्न ऐकून मी टेन्शनमध्ये आलो होतो. मी मरणार आहे का या वयात मी इच्छापत्र का बनवू असा प्रश्न मला पडला होता. मला वाटतं, यावेळी मी फक्त माझ्या बाळाबद्दल विचार करतोय. मी एक चांगला पिता सिद्ध होणार का याचा विचार करतोय. मी भविष्याचर फार विचार नाही करत आणि मी फक्त माझं बेस्ट व्हर्जन बनण्याचाच कायम विचार करतो.'' रणबीर कपूरने एप्रिल २०२२ मध्ये आलिया भटशी लग्न केलं. नोव्हेंबर महिन्यात त्यांनी एका क्यूट मुलीला जन्म दिला.  

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि श्रद्धा कपूरचा (Shraddha Kapoor) 'तू झूठी मैं मक्कार' (Tu Jhoothi main Makkar) हा सिनेमा येत्या 8 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून रणबीर आणि श्रद्धाची जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहे.

Web Title: ranbir kapoor told his ca asked to make will before daughter raha birth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.