सनी देओलला घाबरला रणबीर कपूर? 'अ‍ॅनिमल' ची रिलीज डेट पुढे ढकलली; 'व्हीएफएक्समुळे...'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2023 08:58 AM2023-07-02T08:58:41+5:302023-07-02T08:59:25+5:30

'आदिपुरुष' कडून घेतला धडा

Ranbir Kapoor upcoming movie animal release date gets postponed due to vfx work | सनी देओलला घाबरला रणबीर कपूर? 'अ‍ॅनिमल' ची रिलीज डेट पुढे ढकलली; 'व्हीएफएक्समुळे...'

सनी देओलला घाबरला रणबीर कपूर? 'अ‍ॅनिमल' ची रिलीज डेट पुढे ढकलली; 'व्हीएफएक्समुळे...'

googlenewsNext

अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) त्याच्या आगामी 'अ‍ॅनिमल' सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमातील त्याच्या ढासू लुकमुळे चाहते उत्सुक आहेत. नुकताच सिनेमाचा फर्स्ट लिक रिलीज करण्यात आला होता. मोठे केस, दाढी आणि डोळ्यात आग अशा जबरदस्त लुकमध्ये रणबीरने एंट्री घेतली. सिनेमात रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) सोबत त्याची जोडी आहे. पण आता रणबीर आणि रश्मिकाच्या चाहत्यांना सिनेमाच्या रिलीजसाठी आणखी वाट बघावी लागणार आहे. अ‍ॅनिमलची रिलीज डेट पुढे ढकलण्याचा निर्णय मेकर्सने घेतला आहे. 

संदीप वांगा रेड्डी दिग्दर्शित अ‍ॅनिमल सिनेमाची उत्सुकता खूपच ताणली आहे. यात रणबीरचा कधीही न पाहिलेला लुक दिसणार आहे. सिनेमाचा फर्स्ट लुक रिलीज करण्यात आला तेव्हाच रिलीड डेटही जाहीर करण्यात आली होती. ११ ऑगस्ट रोजी अ‍ॅनिमल चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता. मात्र आता सिनेमा ऑगस्ट महिन्यात रिलीज होणार नाही. रिलीज डेट पुढे ढकलण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आलाय.

कारण काय?

माध्यम रिपोर्ट्सनुसार, 'अ‍ॅनिमल'चे पोस्ट प्रोडक्शनचे काम अजून पूर्ण झालेले नाही. दिग्दर्शक सिनेमाच्या व्हीएफएक्स बाबत कोणतीच रिस्क घेऊ इच्छित नाही. 'आदिपुरुष'मधील गंडलेल्या व्हीएफएक्सनंतर आता संदीप वांगा रेड्डी सावध झाले आहेत. व्हीएफएक्समध्ये गडबड झाली तर सिनेमा कोणीही पाहणार नाही हे त्यांना कळून चुकले.आता सिनेमा १ डिसेंबर रोजी रिलीज होण्याची शक्यता आहे.

सनी देओलसोबत टक्कर नाही 

अभिनेता सनी देओलचा बहुचर्चित सिनेमा 'गदर 2' ११ ऑगस्ट रोजीच रिलीज होणार आहे. २००१ साली रिलीज झालेल्या ब्लॉकबस्टर 'गदर' सिनेमाचा हा सिक्वल असणार आहे. २२ वर्षांनंतर पुन्हा तारासिंग आणि सकीनाची प्रेमकहाणी बघायला मिळणार म्हणून चाहते उत्सुक आहेत. अशातच रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' सिनेमाने माघार घेतल्याने चर्चेला उधाण आलंय. रणबीर कपूर सनी देओलला घाबरला अशी प्रतिक्रिया सनी देओलच्या चाहत्यांमधून येत आहे. 

Web Title: Ranbir Kapoor upcoming movie animal release date gets postponed due to vfx work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.