अरे, एखादं बाहुलं तरी हातात द्यायचं रे..., ‘Shamshera’ची क्लिप पाहून नेटकऱ्यांनी डोक्यावर मारला हात!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 05:29 PM2022-08-23T17:29:02+5:302022-08-23T17:30:39+5:30
Shamshera : ‘शमशेरा’ची व्हायरल क्लिप आत्तापर्यंत 2 लाखांवर लोकांनी पाहिली आहे. ही क्लिप पाहून नेटकरी दिग्दर्शकाची मजा घेत आहेत...
रणबीर कपूर (Ranbir Kapoor ), वाणी कपूर (Vaani Kapoor ) आणि संजय दत्तचा (Sanjay Dutt) ‘शमशेरा’ (Shamshera) हा चित्रपट आला कधी अन् गेला कधी हेही कळलं नाही. रिलीजआधी या चित्रपटाची जोरदार चर्चा होती. पण रिलीज झाला आणि या चित्रपटाचा फ्लॉप शो झाला. रणबीरचा हा सिनेमा इतका दणकून आपटला की, रिलीजला महिना होत नाही तोच ओटीटीवर रिलीज झाला. आता इतक्या दिवसानंतर आम्ही ‘शमशेरा’ची चर्चा का करतोय? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर याचं कारण आहे सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत असलेली या चित्रपटाची एक क्लिप. होय, ‘शमशेरा’मधील एक मोठी चूक यानिमित्ताने समोर आली आहे आणि यावरून नेटकरी ‘शमशेरा’च्या दिग्दर्शकाची चांगलीच मजा घेत आहेत.
Let's just assume that there is a baby 👶#Shamshera#IseewhatIcantpic.twitter.com/4bS0KbV6dY
— Guman Singh Rathore (@GumaanSingh) August 20, 2022
क्लिपमध्ये असं काय?
‘शमशेरा’ची व्हायरल क्लिप आत्तापर्यंत 2 लाखांवर लोकांनी पाहिली आहे. नेटकरी ही क्लिप पाहून दिग्दर्शकाची मजा घेत आहेत. अनेकजण यावरून ‘शमशेरा’च्या मेकर्सला ट्रोलही करत आहेत. आता ही काय भानगड आहे तर, या 6 सेकंदाच्या क्लिपमध्ये एक फाइट सीक्वेन्स पाहायला मिळतो. हिरो शत्रूंसोबत लढतोय आणि हिरोईन आपल्या मुलाला छातीशी कवटाळून पोलिसांशी लढताना, ओरडताना दिसतेय. ही क्लिप बारकाईने बघितल्यावर त्यातली मिस्टेक तुमच्याही लक्षात येईल. होय, हिरोईनच्या हाती बाळ नसून फक्त कपडा आहे. होय, कपडा गोळामोळा करून तेच बाळ असल्याचं दाखवलं आहे. नेमक्या याच कारणावरून या चित्रपटाची खिल्ली उडवली जात आहे.
Seriously.. atleast show a real baby.. a real one can never be held like that. In one scene the eyes of the so called baby were visible.. its a doll 🤭 #ShamsheraOnPrime#Shamshera
— 😈 (@girlwhospitfire) August 21, 2022
अरे, चित्रपटावर करोडो रूपये खर्च केलेत. बाहुलं खरेदी करायला पैसे नव्हते का? एखादं बाहुलंच हिरोईनच्या हातात द्यायचं होतं रे..., अशा कमेंट्स करत नेटकरी मजा घेत आहेत. अनेकांनी यावरून मेकर्सला ट्रोल केलं अहे. बॉलिवूडवाल्यांना काय झालं काय ठाऊक, मेहनतच करायची नाही..., अशी कमेंट एका युजरने केली आहे. म्हणून बॉलिवूड सिनेमे फ्लॉप होत आहेत, अशी प्रतिक्रिया अन्य एका युजरने दिली आहे.