संजूची भूमिका ऑफर झाल्यानंतर रणबीर कपूर 'ही' होती पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2018 11:15 AM2018-06-18T11:15:03+5:302018-06-18T17:56:00+5:30
गीतांजली आंब्रे तो आला त्यांने पाहिले आणि त्यांने जिंकले असेच म्हणावे लागले रणबीर कपूरच्या बाबतीत 'संजू चित्रपटातून कमबॅक करणाऱ्या ...
तो आला त्यांने पाहिले आणि त्यांने जिंकले असेच म्हणावे लागले रणबीर कपूरच्या बाबतीत 'संजू चित्रपटातून कमबॅक करणाऱ्या रणबीरने सगळ्यांना संजू चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजनंतर धक्काच दिला आहे. प्रेक्षकांना तो संजू नसून रणबीर आहे यावर विश्वास बसणे कठीण झाले आहे. त्यामुळे रणबीरने पहिली परीक्षा पास केली आहे असेच म्हणावे लागले. याच निमित्ताने रणबीरचा संजू होण्याचा रिल टू रिअल प्रवासाबाबत त्याच्याशी मारलेल्या या दिलखुलासा गप्पा.
संजूची भूमिका साकारणे तुझ्यासाठी किती आव्हानात्मक होते ?
पहिल्यांदा माझ्याकडे राजकुमार हिरानी आले तेव्हा माझी पहिली प्रतिक्रिया हे कसे शक्य आहे अशी काहीशी होती. संजय सर आजही काम करतायेत. त्यांचे आजही मोठ्या प्रमाणात फॅन फॉलोईंग आहे, आजही ते सुपरस्टार आहे. त्यांचे आयुष्य 20 पासून 60 पर्यंतचे मी कसे काय साकारु शकतो असे अनेक प्रश्न माझ्या मनात उपस्थित झाले होते. पण ज्यावेळी मी सिनेमाची कथा वाचली तेव्हा मला विश्वास आला. राजकुमार हिरानींनी जेव्हा मला संजूची ऑफर दिली होती तेव्हा नुकतेच मी जगा जासूसचे शूटिंग संपवले होते त्यावेळी माझे वजन 70 किलो होते ज्यावेळी आम्ही संजू सिनेमाचे शूटिंग सुरु केले त्यावेळी मी 88 किलोचा होतो. या भूमिकेसाठी मी तब्बल 18 किलो वजन वाढवले. जवळपास आठ महिने माझ्या लूकवर आम्ही काम करत होतो. मग हळूहळू बऱ्याच प्रयत्नानंतर मला त्यांची भूमिका थोडीफार जमायला लागली. या सगळ्यात प्रक्रियेत महत्त्वाचा भाग होता तो म्हणजे माझा स्वत:वरता विश्वास एकदा तो आला की बाकिच्या गोष्टी मेहनत करुन करता येतात.
सिनेमातला कोणता सीन्स करताना तू भावूक झाला होतास ?
असे खूप सारे सीन्स होते जे करताना मी इमोशनल झालो होतो मात्र त्यातील दोन सीन्सचा उल्लेख मला आवर्जून करावासा वाटतोय. रॉकीच्या प्रिमियरच्या दोन दिवस आधी संजय दत्त यांच्या आईचे निधन झाले होते. ते ड्रग्सच्या आहारी गेले होते. रॉकीचे प्रिमियर सुरु असताना ते बाहेर पायऱ्यांवर आपल्या वडिलांशी चर्चा करत असतात कि मला काहीच कळत नाही आहे काय बरोबर काय चूक. हा सीन करणे माझ्यासाठी खूप कठिण गेले त्यानंतरचा दुसरा सीन होता ज्यावेळी सुनिल दत्त यांचे निधन झाले हा संजय सरांच्या आयुष्यातील काळ उभे करणं खूपच कठिण होते. हे दोन्ही सीन्स करताना मी खूपच भावूक झालो होतो.
सिनेमाचे शूटिंग सुरु असताना संजय दत्त सेटवर आले होते का आणि त्यावेळी तुझी रिअॅक्शन काय होती ?
ज्यावेळी संजय सर सेटवर यायचे तेव्हा मी फार नर्वस असायचो, भिती वाटायची. सिनेमातला पहिला सीन आहे ज्यावेळी 60 वर्षांचा संजय दत्त आरशात उभा राहुन बोलत असतो या सीनचे शूट सुरु असताना ते मॉनिटरच्या मागे बसून माझी अॅक्टिंग बघत हसत होते. मी त्यांचे लक्ष नसताना त्यांच्या हालचालींचे बारीक निरीक्षण करायचो जसे त्यांचे बोलणे, हसणे या छोट्या-छोट्या गोष्टी मी टिपत होतो.
सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांसमोर आला त्यावेळी प्रेक्षक काही वेळासाठी विसरुन गेले की हा संजूबाबा नसून रणबीर कपूर आहे. या प्रवासाकडे तू कसा बघतोस ?
खूप आनंद झाला. आमचा पहिला टप्पा होता कि प्रेक्षकांना जाणीव करुन देणे कि हा रणबीर कपूर आहे जो संजय दत्तची भूमिका साकारतो आहे आणि त्यानंतर प्रेक्षकांनी मला संजूबाबा म्हणून स्वीकारणे. आम्हाला वाटते ही पहिली परीक्षा आम्ही पास झाले आहोत. प्रेक्षकांनी मला संजय दत्त यांच्या भूमिकेत स्वीकारले आहे.
प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात चढ-उतार येत असतात. तुझ्याही आले मागच्या काही काळातील तुझे चित्रपट फारसे चालले नाही. याबाबत काय सांगशील ?
जेव्हा तुमचे सिनेमा चालत नाहीत त्यावेळी तुम्हाला अपयशला सामोर जावं लागते त्यावेळी तुमच्या हातात काही नसते. मात्र हाच काळ तुम्हाला खूप काही शिकवून जातो. तुम्ही तरुण असताना तुम्हाला समोरुन संधी चालून येतात. ज्यावेळी तुमचे चित्रपट फ्लॉप होतात त्यावेळी त्याचा परिणाम तुम्हाला लगेच जाणवत नाही. मात्र त्यानंतरच्या येणाऱ्या एक-दोन वर्षात तुम्हाले ते कळते. माझ्या नशिबानं मी कपूर कुटुंबीयांमध्ये जन्माला आलो त्यामुळे बाबा आणि काका यांच्या सिनेमांना मिळणारे यश-अपयश हे मी जवळून पाहिले आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टी मी फारशा मनावर घेत नाही.