ऐश्वर्या रायसोबत रोमंटिक सीन करताना रणबीर कपूरची झाली होती अशी अवस्था, म्हणाला - तिच्या गालांना...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 01:55 PM2023-05-23T13:55:10+5:302023-05-23T13:55:51+5:30
Ranbir Kapoor And Aishwarya Rai Bachchan : 'ऐ दिल है मुश्किल' या चित्रपटात रणबीर कपूरने एक नाही तर दोन अभिनेत्रींसोबत रोमान्स केला होता.
रणबीर कपूर (Ranbir Kapoor) त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांपासून त्याच्या चॉकलेट बॉय इमेजसाठी प्रसिद्ध आहे. आलिया भटपासून ते श्रद्धा कपूरपर्यंत या अभिनेत्याची केमिस्ट्री सर्वांनाच आवडली आहे. बर्याचदा रोमँटिक भूमिकेत दिसणारा रणबीर कपूर बद्दल कोणी म्हटलं की, हा अभिनेता रोमँटिक सीन करायला कचरतो, तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण असंच काहीसं २०१६ मध्ये आलेल्या 'ऐ दिल है मुश्किल' (Ae Dil Hai Mushkil) चित्रपटाच्या सेटवर घडलं होतं.
'ऐ दिल है मुश्किल'मध्ये रणबीर कपूर, अनुष्का शर्मा, फवाद खान आणि ऐश्वर्या राय मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटात रणबीर कपूरने एक नाही तर दोन अभिनेत्रींसोबत रोमान्स केला होता. 'ऐ दिल है मुश्किल'मधील रणबीर आणि ऐश्वर्याच्या केमिस्ट्रीने रणबीर-अनुष्कापेक्षाही प्रेक्षकांची मने जिंकली. पण 'माजी मिस वर्ल्ड'सोबत रोमँटिक सीन शूट करताना रणबीर कपूरची अवस्था बिकट झाली होती.
शूट करताना रणबीरची अशी झाली होती अवस्था...
रणबीरने स्वत: त्याच्या एका जुन्या मुलाखतीत या चित्रपटाशी संबंधित अनुभव शेअर करताना सांगितले होते की, ऐश्वर्यासोबत ऑनस्क्रीन रोमान्स करण्यास तो खूप लाजाळू होता. एका सीनमध्ये ऐश्वर्याच्या गालावर हात ठेवायचा होता, पण तो इतका कावराबावरा झाला होता की हा साधा सीन शूट करायलाही त्याला बराच वेळ लागला, असे या अभिनेत्याने म्हटले होते.
ऐश्वर्याने रणबीरला दिला हा सल्ला
अभिनेत्याने पुढे सांगितले की, तो सीन शूट करताना त्याचे हात थरथरू लागले. त्याची अवस्था पाहून ऐशनेच त्याला मदत केली. अभिनेत्याच्या म्हणण्यानुसार, बच्चन यांच्या सुनेने त्याला समजावून सांगितले की, तो फक्त चित्रपटाचे शूटिंग करत आहे आणि एक अभिनेता म्हणून त्याने त्याचे काम चोख केले पाहिजे. ऐश्वर्या रायच्या सल्ल्यानुसार रणबीर कपूरने दमदार शॉट दिला. हा चित्रपट पाहताना रणबीर ऐशला रोमान्स करण्यास कचरत होता असे म्हणता येणार नाही. 'ऐ दिल है मुश्किल'मध्ये रणबीर-ऐश्वर्यावर अनेक रोमँटिक सीन्स शूट करण्यात आले होते.