आलियाला घेऊन रणबीर कपूर गेला मिनी व्हॅकेशनवर, 'या' स्पेशल व्यक्तीची घेणार भेट?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 14:52 IST2019-06-21T14:52:08+5:302019-06-21T14:52:08+5:30
रणबीर कपूर आणि आलिया भट नुकतेच वाराणसीवरुन 'ब्रह्मास्त्र'चे शूटिंग करुन आले आहेत. व्हॅकेशननंतर दोघे नव्या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.

आलियाला घेऊन रणबीर कपूर गेला मिनी व्हॅकेशनवर, 'या' स्पेशल व्यक्तीची घेणार भेट?
रणबीर कपूर आणि आलिया भट नुकतेच वाराणसीवरुन 'ब्रह्मास्त्र'चे शूटिंग करुन आले आहेत. नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार, दोघे मिनी व्हॅकेशनसाठी न्यूयॉर्कला रवाना झाले आहेत. व्हॅकेशन दरम्यान काही वेळ ते ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांच्यासोबत सुद्धा घालवणार असल्याची माहिती आहे. न्यू -इअर सेलिब्रेट करण्यासाठी देखील याआधी आलिया आणि रणबीर न्यूयॉर्कला गेले होते. न्यूयॉर्कवरुन परतल्यानंतर दोघे त्यांच्या नव्या सिनेमाची शूटिंग सुरुवात करणार आहेत.
वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर आलियाकडे सध्या सिनेमांची लाईन लागलेली आहे. जुलै महिन्यापासून ती महेश भट यांच्या 'सडक 2' नेमाच्या शूटिंगाल सुरुवात करणार आहे. यात ती एका भोंदू बाबाविरोधात लढताना दिसणार आहे. या भोंदू बाबाची भोंदुगिरी उघड करण्याचे काम आलिया करणार आहे.
या लढाईत संजय दत्त तिची मदत करताना दिसणार आहे. यानंतर ती संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'इंशाअल्लाह' सिनेमाच्या शूटिंगला लागणार आहे. यात ती पहिल्यांदाच सलमान खानसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.
भन्साळींच्या या सिनेमात सलमान खान चाळीशीतील एका उद्योगपतीची भूमिका साकारणार आहे. तर आलिया त्याच्यापेक्षा अर्धा वयाच्या एका तरूण अभिनेत्रीच्या भूमिकेत आहे. म्हणजेच, चित्रपटात वेगवेगळ्या जनरेशनची प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. जवळपास 2 वर्ष भन्साळी या सिनेमाच्या स्क्रिप्टवर काम करत होते.दोघांचे चाहते सलमान व आलिया या दोघांना एकत्र रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.