रणबीर कपूरची कथित गर्लफ्रेंड माहिरा खान आहे एका मुलाची आई, आता हे फोटो होत आहेत व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2017 02:55 PM2017-09-24T14:55:24+5:302017-09-24T20:26:09+5:30

रणबीर माहिराच्या स्मोकिंग करतानाच्या वादग्रस्त फोटोनंतर माहिराचे तिच्या तीन वर्षांच्या मुलाबरोबरचे फोटो व्हायरल होत आहेत.

Ranbir Kapoor's alleged girlfriend Mahera Khan is the mother of a child, now these photos are getting viral! | रणबीर कपूरची कथित गर्लफ्रेंड माहिरा खान आहे एका मुलाची आई, आता हे फोटो होत आहेत व्हायरल!

रणबीर कपूरची कथित गर्लफ्रेंड माहिरा खान आहे एका मुलाची आई, आता हे फोटो होत आहेत व्हायरल!

googlenewsNext
ल्या काही दिवसांपासून अभिनेता रणबीर कपूर आणि पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानचे काही फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असल्याने हे दोन्ही स्टार सध्या चर्चेत आहेत. या फोटोंमध्ये रणबीर आणि माहिरा न्यूयॉर्क येथील एका हॉटेलच्या बाहेर स्मोकिंग करताना दिसत आहेत. फोटोमध्ये माहिरा स्मोकिंग तर करत आहेच शिवाय बॅकलेस आणि शॉर्ट ड्रेसमध्ये बघावयास मिळत असल्याने सध्या ती पाक चाहत्यांच्या रडारवर आहे. पाक चाहत्यांना माहिराला चांगलेच सुनावले असून, तिने पाकिस्तानात पायही ठेवू नये, अशी चेतावणी तिला दिली आहे. दरम्यान आता पुन्हा माहिराचे काही फोटो व्हायरल होत असून, त्यामध्ये ती एका मुलासोबत बघावयास मिळत आहे. 

तीन वर्षांचा हा चिमुकला दुसरा-तिसरा कोणीही नसून माहिराचा मुलगा आहे. माहिरा केवळ एका मुलाची आईच नाही तर एक घटस्फोटित महिला आहे. याच वर्षी ३२ वर्षीय माहिरा शाहरूख खानसोबत ‘रईस’मध्ये झळकली होती. चित्रपटात तिने त्याच्या पत्नीची भूमिका साकारली होती. उरी हल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतात येण्यास बंदी घातल्याने ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सहभागी होऊ शकली नव्हती. 
 

पाकिस्तानात माहिरा सर्वात हायएस्ट पेड अभिनेत्रींपैकी एक आहे. २१ डिसेंबर १९८४ मध्ये माहिराचा जन्म कराची येथे झाला होता. तर तिच्या वडिलांचा जन्म दिल्लीत झाला होता. फाळणीनंतर माहिराचा परिवार पाकिस्तानात गेला. माहिराने कराचीतील फाउंडेशन पब्लिक स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले. पुढे इंग्लिश साहित्याचा अभ्यास करण्यासाठी तिने कॅलिफोर्निया येथील विद्यापीठात प्रवेश घेतला. परंतु शिक्षण अर्ध्यावर सोडून ती अभिनेत्री बनली. तेथूनच तिचा पाक इंडस्ट्रीमधील प्रवास सुरू झाला. 
 

पुढे तिने अली अस्करी नावाच्या एका व्यक्तीशी लग्न केले. वास्तविक या लग्नास तिच्या घरच्यांचा विरोध होता. अशातही तिने १३ जुलै २००७ रोजी अलीशी विवाह केला. जवळपास आठ वर्ष एकत्र संसार केल्यानंतर २०१५ मध्ये अली आणि माहिराचा घटस्फोट झाला. या दोघांचा तीन वर्षांचा एक मुलगा आहे. ज्याचे नाव अजलान आहे. अजलान आई माहिरासोबतच राहात आहे. दरम्यान, माहिराचे रणबीरसोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर तिच्यावर सडकून टीका करण्यासाठी तिच्या मुलासोबतचे फोटो सध्या व्हायरल केले जात आहे. 

Web Title: Ranbir Kapoor's alleged girlfriend Mahera Khan is the mother of a child, now these photos are getting viral!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.