रणबीरचा 'अॅनिमल' या दिवशी OTTवर होणार रिलीज, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहायला मिळणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 06:41 PM2024-01-22T18:41:06+5:302024-01-22T18:41:41+5:30
Animal Movie : रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना अभिनीत 'अॅनिमल' चित्रपट १ डिसेंबर, २०२३ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे.
रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) अभिनीत 'अॅनिमल' (Animal Movie) चित्रपट १ डिसेंबर, २०२३ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाचे शोज अद्याप काही थिएटरमध्ये सुरू आहेत. यावरून या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात घर केल्याचे स्पष्ट होते. विकिपीडियाच्या माहितीनुसार, १०० कोटी रुपयांमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात ९०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. याचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा यांनी केले आहे. टी-सीरीज फिल्म्स, भद्रकाली पिक्चर्स आणि सिने १ स्टुडिओ अंतर्गत भूषण कुमार, कृष्ण कुमार, मुराद खेतानी आणि प्रणय रेड्डी वांगा यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.
या चित्रपटात रणबीर कपूरसोबत अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदान्ना आणि तृप्ती डिमरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्याचबरोबर आता या चित्रपटाची ओटीटी रिलीज डेटही फायनल झाली आहे. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आता तुम्ही हा चित्रपट घरबसल्या ओटीटीवर पाहू शकता. तसेच हा चित्रपट ओटीटीवर आणखी मोठा असेल. चित्रपटाचा विस्तारित कट ओटीटीवर प्रदर्शित केला जाईल.
'अॅनिमल' या दिवशी OTTवर होणार दाखल
अलीकडेच, एका मुलाखतीत संदीप रेड्डी वांगा यांनी खुलासा केला होता की, त्यांच्याकडे 'अॅनिमल'चा विस्तारित कट आहे, जो तो ओटीटीवर रिलीज करण्याचा विचार करत आहे. ईटाइम्सच्या रिपोर्टनुसार, आता हा चित्रपट नेटफ्लिक्सवर OTT वर प्रजासत्ताक दिनी म्हणजेच २६ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.
ओटीटीवर प्रदर्शित होणारा हा ३ तास २१ मिनिटांचा चित्रपट ८ मिनिटांच्या विस्तारित कटसह प्रदर्शित केला जाईल, ज्यामुळे एकूण रनटाइम ३ तास २९ मिनिटांपर्यंत वाढेल. असे म्हटले जाते की या विस्तारित आवृत्तीमध्ये रश्मिका मंदान्नाच्या अतिरिक्त दृश्याचा समावेश असेल, जो थिएटरमध्ये दाखवला गेला नाही.