'अॅनिमल'च्या यशानंतर रणबीर कपूरचा भाव वधारला! मानधनात रणवीर सिंगलाही टाकलं मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 11:20 AM2024-01-15T11:20:05+5:302024-01-15T11:20:33+5:30
Ranbir Kapoor : 'अॅनिमल'च्या यशानंतर रणबीर कपूरने त्याच्या मानधनात चांगलीच वाढ केली आहे.
बॉलिवूडचा हॅण्डसम हंक रणबीर कपूर(Ranbir Kapoor)चा 'अॅनिमल' (Animal) १ डिसेंबर, २०२३ रिलीज झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुवांधार कमाई केली. या चित्रपटाने जगभरात ९०० कोटींहून जास्त कमाई केली आहे. या चित्रपटानंतर रणबीरच्या यशाला चारचाँद लागले आहेत आणि सध्या अभिनेता यशाचा आनंद घेत आहे. रणबीर कपूरने या चित्रपटाच्या यशानंतर त्याची ब्रॅण्ड व्हॅल्यू वाढवली आहे आणि त्याच्या करिअरला नवीन भरारी मिळाली आहे. आता अशी माहिती मिळते आहे की, अभिनेत्याने त्याच्या मानधनात चांगलीच वाढ केली आहे.
रणबीर कपूरने त्याच्या मानधनात दुप्पटीहून जास्त वाढ केली आहे. या चित्रपटाच्या यशानंतर अभिनेत्याची लोकप्रियता २ वरून ५वर गेली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणबीर कपूरने 'अॅनिमल'च्या यशानंतर त्याचे मानधन ३० कोटीच्या वर वाढवून ६५ कोटीच्या जवळपास केले आहे. दरम्यान, आपल्या मानधनाच्या वृत्ताला अभिनेत्याने अद्याप दुजोरा दिलेला नाही. असेही सांगितले जात आहे की, मानधनाच्या वाढीबद्दल त्याच्या कुटुंबातील सदस्यांकडेही अद्याप काहीच डिटेल्स नाहीत. दरम्यान, काही रिपोर्ट्समध्ये असेही सांगितले जात आहे की, रणबीर कपूरने 'अॅनिमल'साठी ७० कोटी मानधन घेतले होते.
'संजू'च्या यशानंतर रणबीर कपूरने वाढवले मानधन
'संजू'च्या यशानंतर रणबीर कपूरने मानधनात वाढ केल्याचे समोर आले होते. त्यावेळी मीडिया रिपोर्टमध्ये असे सांगितले होते की, रणबीर कपूरने जाहिरातीसाठी त्याच्या मानधनात वाढ केली आहे. त्याने एका जाहिरातीसाठी त्याचे मानधन ८ कोटींहून १२ कोटी केली आहे. रणबीर कपूरने 'संजू'मध्ये संजय दत्तची भूमिका साकारण्यासाठी २५ कोटी रुपये मानधन केले होते.
पत्नी आलिया भट चित्रपटांसाठी इतके पैसे घेते
त्याची पत्नी आलिया भटबद्दल सांगायचे तर ती तिच्या स्क्रिप्टनुसार फी घेते. ज्याप्रमाणे तिने 'ब्रह्मास्त्र'साठी १०-१२ कोटी रुपये घेतले होते, त्याचप्रमाणे या अभिनेत्रीने 'गंगूबाई काठियावाडी'साठी सुमारे २० कोटी रुपये घेतले होते.