घोडेस्वारी करताना उलटा कोसळला अन्..; रणदीपने शेअर केला काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 11:45 IST2025-03-23T11:43:58+5:302025-03-23T11:45:25+5:30
रणदीप हुडाने स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमाच्या शूटिंगचा एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत रणदीपचा मोठा अपघात झाल्याचं दिसतंय

घोडेस्वारी करताना उलटा कोसळला अन्..; रणदीपने शेअर केला काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ
रणदीप हुडा (randeep hooda) हा बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता. रणदीपने विविध सिनेमांमध्ये बहुरंगी भूमिका साकारत लोकांचं मन जिंकलंय. रणदीपने स्वतः दिग्दर्शित केलेला आणि २०२४ मध्ये प्रदर्शित झालेला 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा चांगलाच गाजला. या सिनेमात रणदीपने स्वतः सावरकरांची भूमिका साकारली होती. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाला १ वर्ष पूर्ण होताच रणदीपने शूटिंगच्या वेळेस आलेला धक्कादायक अनुभव सर्वांसोबत शेअर केलाय. यावेळी घोडेस्वारी करताना रणदीपला कशी दुखापत झाली याविषयी त्याने खुलासा केलाय.
घोडेस्वारी करताना झाला अपघात अन्...
रणदीपने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत रणदीप घोडेस्वारी करताना दिसतो. रणदीपने सुरक्षिततेची सर्व काळजी घेतलेली दिसते. इतक्यात घोडेस्वारी करताना रणदीपचा तोल जातो. घोड्याच्या तोंडाजवळ आपटून रणदीप उलटा जमिनीवर खाली कोसळतो. काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडीओ शेअर करुन रणदीपने 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाच्या शूटिंगचा संपूर्ण प्रवासाचा खास अनुभव शेअर केलाय. मानसिक आणि शारीरिक दुखणं सहन करुनही रणदीपने जिद्दीने 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं अन् हा सिनेमा लोकांसमोर आणला.
रणदीपचं वर्कफ्रंट
रणदीपच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर २०२४ मध्ये रणदीपने 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमात प्रमुख भूमिका साकारली. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तितकी कमाल दाखवली नसली तरी रणदीपच्या अभिनयाचं चांगलंच कौतुक झालं. रणदीप लवकरच सनी देओलसोबत जाट सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात रणदीप खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. १० एप्रिल २०२५ ला हा सिनेमा रिलीज होणार आहे.