आलियाच्या बाजूने मैदानात उतरला रणदीप हुड्डा! कंगनाला लगावला टोला!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 11:13 AM2019-04-17T11:13:19+5:302019-04-17T11:14:50+5:30
कंगनाने इतके डिवचूनही आलियाने यावर कुठलेही उत्तर दिले नव्हते. पण आता आलियाच्या बाजूने तिचा जिगरी मित्र रणदीप हुड्डा याने कंगनाला सणसणीत उत्तर दिले आहे.
तूर्तास आलिया भट तिच्या चित्रपटांमुळे कमी अन् कंगना राणौतच्या आरोपांमुळे अधिक चर्चेत आहे. आलियावर वार करण्याची एकही संधी कंगना सोडत नाही. अलीकडे एका आॅनलाईन पोलमध्ये चाहत्यांनी अभिनयाच्या बाततीत आलियाला कंगनापेक्षा सरस म्हटले आणि कंगनाचा पारा चढला. ‘गली बॉय’मध्ये असे काय होते की, ती सरस ठरावी? तिच्याशी तुलना ही माझ्यासाठी लज्जास्पद गोष्ट आहे. कृपया, सुमार काम करणा-यांना इतके डोक्यावर बसवू नका, असे कंगना म्हणाली होती.
कंगनाने इतके डिवचूनही आलियाने यावर कुठलेही उत्तर दिले नव्हते. पण आता आलियाच्या बाजूने तिचा जिगरी मित्र रणदीप हुड्डा याने कंगनाला सणसणीत उत्तर दिले आहे.
Dearest @aliaa08 I’m so glad you are not letting the opinions of very occasional actors and chronic victims affect you and your work .. kudos to you for your continued efforts to outdo yourself 🤗
— Randeep Hooda (@RandeepHooda) April 16, 2019
‘माझी सर्वाधिक प्रिय आलिया. मला आनंद वाटतो की, तू संधीसाधू कलाकारांच्या मतांना महत्त्व दिले नाहीस. शिवाय जुन्या ‘शिकारी’ कलाकारांच्या बोलण्याचा स्वत:च्या कामावर आणि स्वत:वर कुठलाही परिणाम होऊ दिला नाही. स्वत: सतत पुढे नेण्याच्या तुझ्या प्रयत्नांसाठी शुभेच्छा’, असे ट्वीट रणदीपने केले. त्याने कंगनाचे नाव घेतले नाही. पण त्याचा इशारा कंगनाकडे होता, हे कुणापासूनही लपून राहिलेले नाही.
आलिया व रणदीप हुड्डा या दोघांनी ‘हायवे’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. तेव्हापासून दोघांचीही चांगली मैत्री आहे. कदाचित या मैत्रीपोटीच कंगना सतत आलियाला लक्ष्य करतेय, हे पाहून रणदीप स्वत: मैदानात उतरला. एकंदर काय तर रणदीपच्या रूपात कंगनाला आणखी एक ‘शत्रू’ मिळाला. आता या शत्रूशी बॉलिवूडची क्वीन कशी निपटते, ते पाहुच.