Randeep-Lin Wedding: लग्नमंडपातील पहिला व्हिडीओ आला समोर; मणिपुरी अंदाजात दिसली जोडी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 06:50 PM2023-11-29T18:50:38+5:302023-11-29T18:51:34+5:30

Randeep-Lin Wedding: इंफाळमधील Chumthang Shannapung resort येथे रणदीप-लीन यांचा लग्नसोहळा पार पडत आहे.

randeep-hooda-lin-laishram-first-look-come-out-from-their-wedding-details-inside | Randeep-Lin Wedding: लग्नमंडपातील पहिला व्हिडीओ आला समोर; मणिपुरी अंदाजात दिसली जोडी

Randeep-Lin Wedding: लग्नमंडपातील पहिला व्हिडीओ आला समोर; मणिपुरी अंदाजात दिसली जोडी

 बॉलिवूडचा हँडसम हंक रणदीप हुड्डा (Randeep hooda) याच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. आज (२९ नोव्हेंबर) रणदीप त्याच्या लाँग टाइम गर्लफ्रेंड लीन लॅशराम (lin laishram) हिच्यासोबत लग्न करणार आहे.  नुकताच त्यांच्या लग्नातील पहिला व्हिडीओ समोर आला आहे.

रणदीप आणि लीन पारंपरिक मणिपुरी (traditional Meitei wedding ceremony). पद्धतीने लग्नगाठ बांधणार आहे. त्यामुळे त्यांच्या लग्नातील विधींना आता सुरुवात झाली आहे. एएनआयने त्यांच्या लग्नाचा व्हिडीओ नुकताच शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रणदीप आणि लीन यांनी पारंपरिक पद्धतीचा मणिपुरी पोशाख परिधान केला आहे. सोबतच त्यांच्या घरातील मंडळी लग्नातील विधी पार पाडतांना दिसत आहे.

इंफाळमधील Chumthang Shannapung resort येथे रणदीप-लीन यांचा लग्नसोहळा पार पडत आहे. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत रणदीप-लीन लग्न करत आहेत.

बिझनेस वूमन आहे रणदीप हुड्डाची होणारी बायको; शाहरुख-प्रियांकासोबत आहे खास कनेक्शन

दरम्यान, रणदीप आणि लीन बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. लीन मूळची मणिपूरमधील इंफाळ येथील असून ती मॉडेल, अभिनेत्री आणि यशस्वी बिझनेस वूमनदेखील आहे. तिने प्रियांका चोप्राच्या 'मेरी कॉम' या सिनेमात काम केलं आहे. तसंच तिने 'रंगून', 'उमरिका' या सिनेमांमध्येही काम केलं आहे. इतकंच नाही तर शाहरुखच्या ओम शांती ओम या सिनेमातही तिने स्क्रीन शेअर केली आहे. अलिकडेच ती करिना कपूरच्या 'जाने जान' या सिनेमात झळकली.
 

Web Title: randeep-hooda-lin-laishram-first-look-come-out-from-their-wedding-details-inside

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.