'पैसा कमव नाहीतर नंतर...' भाईजानसोबत कसं आहे रणदीप हुड्डाचं नातं? म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 13:46 IST2024-04-01T13:46:11+5:302024-04-01T13:46:37+5:30
रणदीप हुड्डा आणि सलमान खानने तीन सिनेमांमध्ये एकत्र काम केले आहे.

'पैसा कमव नाहीतर नंतर...' भाईजानसोबत कसं आहे रणदीप हुड्डाचं नातं? म्हणाला...
अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) सिनेसृष्टीतील अंडररेटेड आणि टॅलेंटेड अभिनेत्यांपैकी एक आहे. सध्या तो 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमामुळे चर्चेत आहे. थोर क्रांतीकारी वीर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारित या सिनेमात रणदीपने मुख्य भूमिका साकारली आहे. त्याच्या अभिनयाचं विशेष कौतुक होतंय. या सिनेमातून त्याने दिग्दर्शनातही पाऊल ठेवलंय. रणदीपने हा सिनेमा बनवण्यासाठी त्याचं घरही विकलं होतं. आता नुकतंच सिनेमाच्या प्रमोशननिमित्त त्याने काही गोष्टी शेअर केल्या आहेत.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रणदीपने सलमान खानसोबत (Salman Khan) त्याचा नक्की कसा बाँड आहे याचा खुलासा केला. तो म्हणाला, "जेव्हा केव्हा आम्ही भेटतो तेव्हा मजा मस्ती करतो. बॉडी, फिटनेसविषयी बोलतो, कामाविषयीही बोलतो. तो नेहमीच मला सल्ला देतो की पैसै कमव आणि अजून काम कर. आताच पैसे कमवले नाहीस तर नंतर कठीण जाईल. तो मला बरंच काही सांगतो पण मी त्याच्या खूप कमी गोष्टी ऐकल्या आहेत."
तो पुढे म्हणाला, "त्याच्या मनात नेहमी माझं सगळं चांगलं होवो असंच असतं. माझी विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. पण मी त्याचा सल्ला ऐकतो आणि शक्य असेल तेव्हा कुठे ना कुठे ते पाळण्याचा प्रयत्न करतो. मी स्वत:ला पूर्णच बदलू शकत नाही."
रणदीप हुड्डाने सलमान खानसोबत 'सुल्तान','किक', आणि राधे' अशा तीन सिनेमांमध्ये काम केलं आहे. दोघांनी 2014 साली पहिल्यांदा 'किक' मध्ये काम केलं. यामध्ये रणदीप पोलिसाच्या भूमिकेत होता. याशिवाय सुल्तान मध्ये कोच होता तर राधेमध्ये व्हिलन होता.