रणदीप हुड्डा म्हणाला, एखाद्या महिलेने सेक्स एन्जॉय केला म्हणजे ती वेश्या आहे काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2017 11:39 AM2017-03-10T11:39:00+5:302017-03-10T17:09:00+5:30
‘सरबजीत’ आणि ‘सुल्तान’सारख्या सिनेमांमध्ये भूमिका साकारणारा अभिनेता रणदीप हुड्डा याने एका रिअॅलिटी शोदरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे तो वादाच्या भोवºयात सापडण्याची ...
‘ रबजीत’ आणि ‘सुल्तान’सारख्या सिनेमांमध्ये भूमिका साकारणारा अभिनेता रणदीप हुड्डा याने एका रिअॅलिटी शोदरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे तो वादाच्या भोवºयात सापडण्याची शक्यता आहे. एमटीव्हीवरील ‘बिग आॅफ सीझन-२’मधून रणदीप टीव्ही डेब्यू करीत आहे. या शोनिमित्त नुकताच तो एका इव्हेंटमध्ये बघावयास मिळाला होता. यावेळी शोविषयी बोलताना तो म्हणाला की, महिला या पुरुषांच्या डिझायर नाहीत, तर त्या मानव म्हणून या पृथ्वीवर जन्मास आल्या आहेत. त्यामुळे एखादी महिला सेक्स एन्जॉय करीत असेल तर तिला आपण वेश्या म्हणू शकत नाही, यावर या शोमधून प्रकाश टाकण्यात आला आहे.
पुढे बोलताना रणवीर म्हणाला की, एखादी महिला सेक्स एन्जॉय करत असेल किंवा एखादी मुलगी कोण्या मुलाबरोबर फिरायला जात असेल तर याचा अर्थ ती कॅरेक्टर लेस आहे असा होत नाही. कारण कुठलीही महिला अथवा मुलगी अगोदर मानव आहे. जर एखादी मुलगी एखाद्यास नाही म्हणत असेल तर याचा अर्थ ‘क्लिअर नो’ असा आहे. आपण त्या महिलेच्या भावनांची कदर करायला हवी.
वास्तविक हा शो भारतीय महिलांच्या मानसिकतेवर आधारित आहे. ज्यामध्ये त्या महिला त्यांच्या ‘हिडन डिझायर’ला लपविण्याचा प्रयत्न करीत असतात. रणदीपने सांगितले की, मी या शोमध्ये अशाच पुरुषांना अॅड्रेस करणार जे महिलांना केवळ आॅब्जेक्ट समजत असून, महिलांना अशाच प्रकारे ट्रीट करायला हवे अशी भावना ठेवतात.
रणदीपने म्हटले की, आपण २०१७ मध्ये वावरत आहोत; मात्र महिलांच्या सेक्स्युअल डिझायर आणि फॅँटेसीविषयी बोलण्यास आजही आपल्या सोसायटीमध्ये टॅबू मानले जाते. या शोच्या माध्यमातून आम्ही याचा विषयावर प्रकाशझोत टाकणार असून, देशातील त्या तमाम, स्त्री-पुरुषांना आम्ही सांगणार की, तुम्हाला तुमचे विचार शेअर करण्याचे स्वातंत्र्य आहे.