'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमात रणदीपच्या सख्ख्या बहिणीने केलंय काम! साकारलीय ही भूमिका

By देवेंद्र जाधव | Published: March 28, 2024 02:16 PM2024-03-28T14:16:34+5:302024-03-28T14:18:00+5:30

काय सांगता! स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमात रणदीप हूडाच्या सख्ख्या बहिणीने केलंय काम. या भूमिकेत झळकली. तुम्हाला माहित नसेल तर वाचा बातमी

Randeep hooda sister anjali hooda worked in the movie Swatantryaveer Savarkar role of madam cama | 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमात रणदीपच्या सख्ख्या बहिणीने केलंय काम! साकारलीय ही भूमिका

'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमात रणदीपच्या सख्ख्या बहिणीने केलंय काम! साकारलीय ही भूमिका

'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. या वर्षीचा बहुप्रतिक्षित - बहुचर्चित सिनेमा म्हणून 'स्वातंत्र्यवीर सावरकर'कडे पाहिलं जातंय. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमात रणदीप हूडाने साकारलेली वीर सावरकरांची भूमिका सध्या चांगलीच गाजतेय. खुप कमी जणांना माहित असेल, रणदीपच्या सख्ख्या बहिणीने 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमात काम करुन एक खास भूमिका साकारलीय.

हो तुम्ही बरोबर ऐकताय! 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमात रणदीप हूडाच्या सख्ख्या बहिणीने एक खास भूमिका साकारली आहे. रणदीपच्या बहिणीचं नाव अंजली असून त्यांनी सिनेमात मॅडम कामांची भूमिका साकारली आहे. रणदीप आणि अंजली यांचे अनेक एकत्रित सीन्स 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमात पाहायला मिळतात. अंजली हूडा या पेशाने MD डॉक्टर आहेत. अंजली यांचं स्वतःचं क्लिनीक असून त्या सोशल मीडियावरही सक्रीय आहेत. त्या हेल्थ केअर टीप्सच्या अनेक रील्स व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात.

रणदीपने 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमात बहिण अंजली यांना अभिनय करण्याची संधी दिली. अंजली यांनीही मादाम कामांची भूमिका चांगली साकारल्याचं दिसतं. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाबद्दल सांगायचं तर, क्रांतीकारक वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारीत हा सिनेमा आहे. रणदीप हूडा सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे. याशिवाय अंकिता  लोखंडे. राजेश खेरा, अमित सियाल आदी कलाकार सुद्धा महत्वाच्या  भूमिकेत झळकत आहेत. 

Web Title: Randeep hooda sister anjali hooda worked in the movie Swatantryaveer Savarkar role of madam cama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.