रणधीर कपूरने सांगितली करिनाची इच्छा; तैमूर व्हावा क्रिकेटर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2017 04:54 PM2017-01-07T16:54:41+5:302017-01-07T17:04:21+5:30
बॉलिवूड सेलिब्रेटी करिना कपूर व सैफ अली खान यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाल्यानंतर आनंद साजरा केला जात आहे. ...
ब लिवूड सेलिब्रेटी करिना कपूर व सैफ अली खान यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाल्यानंतर आनंद साजरा केला जात आहे. करिनाने आपल्या पहिल्या बाळाचे नाव तैमूर असे ठेवले. यामुळे सोशल मीडियावर या नावाची चर्चा झाली. आई-वडील अभिनेते असल्याने तैमूरही मोठा झाल्यावर चित्रपटात काम करेल असा अंदाज लावला जात आहे. मात्र, करिनाला आपला मुलगा तैमूर हा त्याचे आजोबा टायगर पतौडी प्रमाणे क्रिकेटर व्हावा असे वाटत असल्याचे करिना कपूरचे वडील रणधीर कपूर यांनी सांगितले.
करिनाचे वडील रणधीर कपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार तैमूरच्या नावावरून निर्माण झालेल्या वादामुळे सैफ व करिना यांना चांगलेच वाईट वाटले. मात्र तैमूर हा अरबी शब्द असून त्याचा अर्थ लोखंडासारखा मजबूत असा होतो. ज्या लोकांना हे नाव आवडले नाही त्यांनी हा विषय छेडण्याची आवशक्ता नाही. काही लोकांनी ही चर्चा यासाठी रंगविली कारण त्यांना वाटत होते करिनाचा मुलगा मरावा, असाही खळबळजनक खुलासा त्यांनी केला. रणधीर कपूर म्हणाले, तैमूरच्या जन्मापासून आम्ही सर्व त्याच्यासोबत अधिकाधिक वेळ घालविण्याचा प्रयत्न करीत आहोत. करिश्माची मुले तैमूरसोबत चांगलीच मिसळली आहेत. विशेष म्हणजे करिना मला म्हणाली की माझा मुलगा क्रि केटर व्हावा यासाठी तुम्ही प्रयत्न करा.
करिनाच्या या इच्छेमागे कारणही तसेच आहे. करिना क पूर आता पतौडी नवाबांची सून असल्याने आपल्या मुलाने कुटुंबाचा वारसा चालवावा असे तिला वाटू लागले आहे. म्हणूनच आपला मुलगा मोठा झाल्यावर आजोबा मंसूर अली खान पतौडी ऊर्फ टायगर पतौडीप्रमाणे क्रिकेटर व्हावा असे वाटू लागले आहे. भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार राहिलेले टायगर पतौडी यशस्वी कर्णधारांपैकी एक आहेत. सैफ अली खान देखील उत्कृष्ट क्रिके टपटू असून, त्याने एक मुलाखतीमध्ये अभिनेता झालो नसतो तर मी क्रिके टर असतो असे सांगितले होते. यामुळेच करिनाला हे वाटने स्वाभाविकच आहे. वेल आपण लवकरच तैमूरला निळ्या टी-शर्टमध्ये पाहू अशी अपेक्षा करूयात.