रंगोलीला मलायकाची सोशल मीडियावर खिल्ली उडवणं पडलं भारी, युजर्स म्हणाले - डर्टी माइंड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 06:21 PM2019-11-06T18:21:28+5:302019-11-06T18:21:55+5:30

कंगना रानौतची बहिण रंगोल चंडेलने मलायका अरोराचा मुलासोबत असलेल्या सेल्फीवर कमेंट करीत खिल्ली उडवली आहे. मात्र तिची ही मस्करी तिलाच भारी पडली आहे.

Rangoli Chandel takes a jibe at Malaika Arora for picture with son Arhaan; Says ‘This is modern Indian mother’ | रंगोलीला मलायकाची सोशल मीडियावर खिल्ली उडवणं पडलं भारी, युजर्स म्हणाले - डर्टी माइंड

रंगोलीला मलायकाची सोशल मीडियावर खिल्ली उडवणं पडलं भारी, युजर्स म्हणाले - डर्टी माइंड

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौतची बहिण रंगोली चंडेल तिच्या विधानांमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असते. कधी ती कोणत्या अभिनेत्रीच्या कामावर कमेंट करते तर कधी नेपोटिझ्मवर. मात्र यावेळेस तिने मलायका अरोरा व तिच्या मुलाच्या सेल्फीवर कमेंट केली आहे. तिने त्यांच्या सेल्फीवर उडवलेली खिल्ली तिलाच भारी पडली आहे. कारण सोशल मीडियावर युजर्सनं तिला ट्रोल केलं आहे.


मलायका अरोराने सोशल मीडियावर मुलगा अरहानसोबत वेळ व्यतित करत फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत मलायकानं लिहिलं की, जेव्हा मुलगा चांगला असेल आणि आपल्या आईची काळजी घेत असेल.




मलायकाचा हा फोटो रंगोलीने ट्विटरवर शेअर करत लिहिलं की, ही आहे मॉडर्न भारतीय आई. खूप छान. 


रंगोलीने मलायकाचे नाव घेऊन तिच्याबद्दल बोलली नव्हती. परंतु, युजर्सनं रंगोलीने शेअर केलेल्या फोटोनंतर तिला चांगलेच ट्रोल केले.




एका युजर्सनं रंगोलीला डर्टी माइंड म्हटलं. त्यानंतर रंगोलीने ट्विट करत तिच्या म्हणण्यामागचा अर्थ सांगितला. रंगोलीने ट्विट केलं की, लोक मलायका बद्दल खूप वाईट लिहित आहेत. मी तिला मॉर्डन डेजमधील आई म्हटलं होतं. मात्र लोक तिच्याबद्दल घाणेरडं लिहित आहेत. हा फोटो सूचना देतो आहे, याचं मला आश्चर्य वाटत आहे. लोकांना माझी विनंती आहे की त्यांनी त्यांच्या कल्पनाशक्तीला ठीक करावे. हे योग्य नाही.

Web Title: Rangoli Chandel takes a jibe at Malaika Arora for picture with son Arhaan; Says ‘This is modern Indian mother’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.