'मला कंटाळा आलाय..';पोस्ट शेअर करत प्रसिद्ध अभिनेत्रीचा सोशल मीडियाला रामराम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 01:53 PM2024-02-16T13:53:59+5:302024-02-16T13:54:45+5:30

Actress: या अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत सोशल मीडिया सोडण्यामागचं कारण सांगितलं आहे.

rani-chatterjee-taking-break-from-social-media | 'मला कंटाळा आलाय..';पोस्ट शेअर करत प्रसिद्ध अभिनेत्रीचा सोशल मीडियाला रामराम

'मला कंटाळा आलाय..';पोस्ट शेअर करत प्रसिद्ध अभिनेत्रीचा सोशल मीडियाला रामराम

सोशल मीडिया सध्याच्या काळातलं प्रभावी माध्यम झालं आहे. त्यामुळे या माध्यमामधून सेलिब्रिटी थेट चाहत्यांच्या संपर्कात राहतात. परंतु, सोशल मीडियामुळे कलाकारांना जितकं प्रेम मिळतं तितकाच ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. त्यामुळेच आतापर्यंत अनेक कलाकारांनी सोशल मीडियापासून फारकत घेतली आहे. यामध्येच एका प्रसिद्ध अभिनेत्रीने सुध्दा सोशल नेटवर्किंगला रामराम केला आहे. एक पोस्ट शेअर करत तिने या माध्यमापासून दूर जाण्याचं कारण सांगितलं आहे.
भोजपुरी सिनेइंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे राणी चटर्जी. अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये झळकलेल्या रानीचा आज सोशल मीडियावर प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. परंतु, या सगळ्यांपासून रानीने काही काळासाठी फारकत घेतली आहे.  सोशल मीडियापासून दूर जाण्यामागे तिने एक कारणदेखील सांगितलं आहे.

काय आहे राणीची पोस्ट?

"तुम्हाला सगळ्यांना मला काही सांगायचं आहे.  मी एक छोटा ब्रेक घेते. मला कंटाळा आलाय. मला एका गोष्टीची जाणीव झालीये की, सोशल मीडियावर सतत राहण्याची सवय मला बदलायची आहे. मला जेव्हा वाटेल तेव्हा मी पुन्हा परत येईन. पण, मी सगळ्यांना खूप मिस करेन. काही दिवसांसाठी मला या सगळ्यापासून लांब रहायचं आहे, असं म्हणन रानीने तिची पोस्ट शेअर केली आहे.

दरम्यान, राणीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक चाहत्यांनी तिच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. तर, काहींनी तिला स्वत:साठी वेळ दे, असा सल्ला दिला आहे. राणी भोजपुरी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने  २००४ मध्ये 'ससुरा बडा पैसेवाला' या सिनेमातून कलाविश्वात पदार्पण केलं.

Web Title: rani-chatterjee-taking-break-from-social-media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.