या एका कारणामुळे कधीच मीडियासमोर येत नाही आदित्य चोप्रा, रानी मुखर्जीसह थाटलाय संसार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 12:33 PM2021-05-22T12:33:53+5:302021-05-22T12:40:07+5:30
राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा या दोघांचे नाते कसे जुळले हे कायम गुलदस्त्यातच राहिले.कधीच दोघांची लव्हस्टोरी जगासमोर येऊ दिली नाही.
आदित्य चोप्रा यांना लाईमलाइटमध्ये राहणे अजिबात आवडत नाही.दिवंगत यश चोप्रा यांचा आदित्य चोप्रा मोठा मुलगा आहे. वयाच्या १८ व्या वर्षीच त्यांनी वडिलांसोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्यास सुरवात केली होती. तर त्यांनी वयाच्या 23 व्या वर्षी अजरामर ठरलेल्या 'दिलवाल्या दुल्हनिया ले जायेंगे' या सिनेमाचे दिग्दर्शन केले.अनेक ब्लॉकबस्टर सिनेमा देऊनही, आदित्य कधीच मीडियाच्या कॅमेरा समोर येत नाही. आदित्यचे मीडियाला कधीच सामोरे न जाण्यास एक कारण आहे, हे जाणून चाहत्यांनाीह आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
मुळात आदित्य हा स्वभावाने अतिशय लाजाळू आहे. दुसरे गंभीर कारण म्हणजे आदित्य एका वेगळ्याच आजाराने त्रस्त आहे.'पर्सनालिटी डिसऑर्डर' या आजाराने आदित्य त्रस्त आहे. हा आजार असणारे व्यक्ती गर्दीचा सामना करण्यात सक्षम नसतात. म्हणून आदित्य चोप्रा कधीच कोणत्याही मुलाखतीत किंवा पत्रकार परिषदेत येत नाही.
खाजगी आयुष्यात आदित्य एकदम मनमौजी आहे. खूप बोलायलाही आवडते. तासन तास तो त्याच्या निकटच्या लोकांसह फोनवर बोलत असतो. इतकेच काय तर रानी मुखर्जी आणि आदित्य दोघांच्या अफेअरच्या चर्चाही खूप रंगल्या.
राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा या दोघांचे नाते कसे जुळले हे कायम गुलदस्त्यातच राहिले.कधीच दोघांची लव्हस्टोरी जगासमोर येऊ दिली नाही. विशेष म्हणजे राणी मुखर्जी जेव्हा आदित्य चोप्राच्या आयुष्यात आली तेव्हा तो आधीच विवाहित होता. आदित्य चोप्राचे पहिले लग्न २००० मध्ये पायल खन्ना हिच्यासोबत झाले आणि २००९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
रानी मुखर्जीसह लग्न करण्यासाठी यश चोप्रा यांनी आदित्यला नकार दिला होता. यश चोप्रा यांना आदित्य चोप्राने पहिल्या पत्नीला घटस्फोट देण्याचा निर्णय अजिबात पटला नव्हता. रानीसह लग्न करण्यासाठी घरच्यांच्या विरोधात आदित्य चोप्राने रानीसह दुस-यांदा संसार थाटला. रानीसाठी आदित्यने घर सोडले होते.
हॉटेलमध्ये काही दिवस आदित्य राहिला होता. आदित्यसोबत लग्न केल्यानंतर रानीवर प्रचंड टीका झाली.रानीने पायलचे घर तोडले असेही तिच्यावर टीका झाली.मात्र रानीने कधीच यावर उत्तर दिले नाही.नेहमीच मौन राहणे तिने पसंत केले.