राणी मुखर्जीला हवे दुसरे बाळ ! आता होतोय पश्चाताप...!!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2017 07:16 AM2017-11-26T07:16:17+5:302017-11-26T12:46:17+5:30
दीर्घकाळानंतर ‘हिचकी’ या चित्रपटातून वापसी करण्यास सज्ज असलेली राणी मुखर्जी हिने अलीकडे मनातली सगळी गुपितं सगळ्यांसमोर उघडी केलीतं. होय, ...
द र्घकाळानंतर ‘हिचकी’ या चित्रपटातून वापसी करण्यास सज्ज असलेली राणी मुखर्जी हिने अलीकडे मनातली सगळी गुपितं सगळ्यांसमोर उघडी केलीतं. होय, मी दुस-या बाळासाठी प्रयत्न करतेयं, हे तिने सगळ्यांसमोर कबुल केले.
खरे सांगायचे तर राणीला सध्या एक पश्चाताप होतोय. पश्चाताप कुठला? तर आधीच बाळाचे प्लॅनिंग का केले नाही याचा. आपले हे दु:ख तिने जाहिरपणे बोलून दाखवले. ‘आता मनात असूनही मी माझे कुटुंब वाढवू शकत नाही. कदाचित मी संधी गमावलीयं. मी फॅमिलीचे प्लॅनिंग करण्यात उशीर केला, याचा मला पश्चाताप आहे. मी आधीच हे प्लॅनिंग करायला हवे होते. अर्थात मी अद्यापही हिंमत सोडलेली नाही. दुस-या मुलासाठी मी प्रयत्न करत राहणार आहे,’असे राणी एका मुलाखतीत म्हणाली. राणी व आदित्य चोप्रा यांना आदिरा एक मुलगी आहे.
या मुलाखतीत राणीने पती आदित्यबद्दलही बोलली. मी आदित्यसोबत चित्रपटांबद्दल कधीच बोलत नाही. मला तुझ्या चित्रपटात कास्ट कर, असे मी त्याला कधीच म्हटलेले नाही. मी आदित्यसोबत केवळ आदिरा आणि प्रेम या दोनच विषयांवर बोलते, असे तिने सांगितले.
बॉलिवूडमधील प्रवासाबद्दलही तिने सांगितले. हिरोईन बनण्याची माझी कुठलीही इच्छा नव्हती. पण माझ्या आईला ते हवे होते. माझ्या वडिलांनाही मी अभिनेत्री बनू नये, असेच वाटत होते. पण आईच्या इच्छेखातर मी बॉलिवूडमध्ये आले. एकदा प्रयत्न तर करून बघ, असे ती मला म्हणाली आणि तिचे ऐकून मी एक प्रयत्न केला. अर्थात त्यानंतर मागे वळून बघितलेच नाही, असेही राणी म्हणाली.
ALSO READ : राणी मुखर्जीला योगायोगाने मिळाला होता ‘कुछ कुछ होता है’ सिनेमा
राणीने उडिसी नृत्याचे धडे घेतले आहेत. सन १९९७ मध्ये ‘राजा की आयेगी बारात’ या चित्रपटाद्वारे राणीने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर फार यश मिळवू शकला नाही. पण यातील राणीच्या अभिनयाने पे्रक्षकांना मंत्रमुग्ध केले होते.
२१ एप्रिल २०१४ रोजी राणीने पॅरिसमध्ये दिग्दर्शक व निर्माता आदित्य चोप्राशी गुपचूप लग्न केले होते. ९ डिसेंबर २०१५ रोजी राणीने आदिराला जन्म दिला होता.