पहावं ते नवलच..! रणवीर सिंगची ड्रेसिंग स्टाईल कॉपी केली बॉलिवूडच्या या अभिनेत्रीनं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 04:59 PM2019-11-26T16:59:00+5:302019-11-26T16:59:30+5:30

बऱ्याचदा कलाकारांना सेम टू सेम ड्रेसिंग स्टाईलमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.

Rani Mukharji trolled for same outfit like Ranveer Singh | पहावं ते नवलच..! रणवीर सिंगची ड्रेसिंग स्टाईल कॉपी केली बॉलिवूडच्या या अभिनेत्रीनं

पहावं ते नवलच..! रणवीर सिंगची ड्रेसिंग स्टाईल कॉपी केली बॉलिवूडच्या या अभिनेत्रीनं

googlenewsNext

नुकताच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. या फोटोत रणवीर सिंग आणि राणी मुखर्जी एक सारख्या कपड्यांमध्ये दिसत आहेत. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसादिवशी रणवीर सिंगने फ्लोरल प्रिंट असलेलं डार्क रंगाचा कुर्ता व पायजमा परिधान केला होता आणि नुकताच तशीच प्रिंट असलेल्या ड्रेसमध्ये बॉलिवूडची मर्दानी म्हणजेच राणी मुखर्जी दिसली. त्यानंतर तिला नेटकऱ्यांनी ट्रोल करायला सुरूवात केली.  


राणी मुखर्जी सध्या आगामी चित्रपट मर्दानीच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या प्रमोशनसाठी तिनं सब्यसाचीने डिझाईन केलेला ड्रेस परिधान केला होता. तिचा हा फोटो स्वतः सब्यसाचीनं त्यांच्या ऑफिशिअल इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. मात्र राणीच्या लुकमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला.


राणी मुखर्जीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांना तिला पाहून रणवीर सिंगची आठवण आली. रणवीर सिंगनं काही दिवसांपूर्वीच लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला यावेळी त्यानं जो ड्रेस घातला होता. तो ड्रेस आणि राणी मुखर्जीच्या प्रमोशन लूकमध्ये काहीही फरक नव्हता. विशेष म्हणजे रणवीरचा ड्रेस सुद्धा डिझायनर सब्यसाचीनं डिझाइन केला होता.


राणीचा लूक पाहिल्यावर लोकांना हे ओळखायला वेळ लागला नाही की राणीचा ड्रेस रणवीरच्या ड्रेससारखा आहे. त्यानंतर सर्वांनीच सोशल मीडियावर राणी मुखर्जीला यावरून ट्रोल करायला सुरुवात केली.


राणी आणि रणवीरच्या ड्रेसमध्ये फरक फक्त एवढाच होता की राणीने यासोबत दुपट्टा घेतला होता. तर रणवीरनं यावर जॅकेट घातलं होतं.

Web Title: Rani Mukharji trolled for same outfit like Ranveer Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.