​ २२ वर्षांपासून ‘या’ समस्येशी लढतेयं राणी मुखर्जी! कुणालाही नव्हती खबर!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 05:38 AM2017-12-13T05:38:25+5:302017-12-13T11:09:42+5:30

राणी मुखर्जी ही बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.  राणी लवकरच ‘हिचकी’ या चित्रपटात दिसणार आहे. बोलताना अडखळणा-या किंवा काहीसे ...

Rani Mukherjee fought for 'this' problem for 22 years! No news of anyone | ​ २२ वर्षांपासून ‘या’ समस्येशी लढतेयं राणी मुखर्जी! कुणालाही नव्हती खबर!!

​ २२ वर्षांपासून ‘या’ समस्येशी लढतेयं राणी मुखर्जी! कुणालाही नव्हती खबर!!

googlenewsNext
णी मुखर्जी ही बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.  राणी लवकरच ‘हिचकी’ या चित्रपटात दिसणार आहे. बोलताना अडखळणा-या किंवा काहीसे तोतरे बोलणा-या महिलेची भूमिका राणी या चित्रपटात साकारणार आहे. कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल की, ‘हिचकी’मधील ही भूमिका राणीच्या रिअल लाईफशी संबंधित आहे. होय, राणीला स्वत:लाही वाणी दोष आहे. म्हणजेच, राणी बोलताना अडखळते.  अर्थात गत २२ वर्षांत राणीने या दोषावर पूर्णपणे विजय मिळवला आहे. राणीने स्वत: ही माहिती दिली. तिने सांगितले की, मला आधी स्टॅमरिंगची अडचण होती. पण प्रयत्नांती मी या अडचणीवर मात केलीय. गत २२ वर्षांपासून मला हा त्रास आहे. पण याबद्दल कुणालाही कळले नाही. इतरांना काय पण माझ्या टीमलाही अनेक वर्षे माझ्या या समस्येबद्दल माहित  नव्हते. मी या समस्येवर काम केले. याचमुळे समोरची व्यक्ती मला पकडू शकत नाही. आता ही माझी कमजोरी राहिलेली नाहीय. चित्रपटाचे संवाद बोलताना कुठे थांबायचे, कुठे पॉझ घ्यायचा, याची मी काळजी घेते. त्यामुळेच माझी ही समस्या कुणाच्याच लक्षात येत नाही.
अलीकडे राणीचे वडिल राम मुखर्जी यांचे निधन झाले. वडिलांचे निधन राणीसाठी धक्कादायक होते. या काळात राणी डिप्रेशनमध्ये जाते की काय, असे अनेकांना वाटले होते. पण राणीची दोन वर्षांची मुलगी आदिराने तिला डिप्रेशनमध्ये जाण्यापासून रोखले. होय, वडिलांच्या निधनानंतर मी खचले होते. पण आदिराचा चेहरा समोर आला की, स्वत:चे दु:ख बाजूला पडते. केवळ आदिरा होती म्हणून मी या दु:खातून बाहेर पडू शकले, असे राणीने सांगितले.

ALSO READ : ​राणी मुखर्जीला हवे दुसरे बाळ ! आता होतोय पश्चाताप...!!

यशराज बॅनरखाली तयार होत असलेला ‘हिचकी’ हा चित्रपट सिद्धार्थ पी मल्होत्रा दिग्दर्शित करत आहेत. मनीष शर्मा या चित्रपटाचा निर्माता आहे.
सन १९९७ मध्ये ‘राजा की आयेगी बारात’ या चित्रपटाद्वारे राणीने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर फार यश मिळवू शकला नाही. पण यातील राणीच्या अभिनयाने पे्रक्षकांना मंत्रमुग्ध केले होते.२१ एप्रिल २०१४ रोजी राणीने पॅरिसमध्ये दिग्दर्शक व निर्माता आदित्य चोप्राशी गुपचूप लग्न केले होते. ९ डिसेंबर २०१५ रोजी राणीने आदिराला जन्म दिला होता.

Web Title: Rani Mukherjee fought for 'this' problem for 22 years! No news of anyone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.