अखेर राणी मुखर्जीची लेक आदिराची झलक दिसलीच, नेटकरी म्हणाले, "किती मोठी झाली..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 20:11 IST2024-03-04T20:10:54+5:302024-03-04T20:11:56+5:30
अंबानींच्या पार्टीत राणी मुखर्जीने छोट्या आदिराची 'थलायवा' रजनीकांत यांच्याशी ओळख करुन दिली.

अखेर राणी मुखर्जीची लेक आदिराची झलक दिसलीच, नेटकरी म्हणाले, "किती मोठी झाली..."
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर फक्त गुजरातमधील जामनगरच ट्रेंडिंगमध्ये आहे. श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या लेकाचा प्री वेडिंग सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला जगभरातील दिग्गजांनी हजेरी लावली. प्रत्येक जण आपल्या कुटुंबासोबत सोहळ्यात उपस्थित होता. डान्स, गाणी अशी एकूणच धमाल बघायला मिळाली. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटला सर्वांनीच शुभेच्छा दिल्या. दरम्यान अनेक सेलिब्रिटींची लहान मुलंही तीनही दिवस जामनगरमध्येच होती. करिना सैफची तैमुर आणि जेह ही दोन्ही मुलं, शाहीद कपूरची दोन्ही मुलं झेन आणि मिशा तसंच रणबीर आणि आलियाची लेक राहाने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. दरम्यान या सोहळ्यात राणी मुखर्जीची ((Rani Mukherjee) लेक 'आदिरा' (Adira Chopra) चीही पहिल्यांदाच झलक बघायला मिळाली.
राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा (Aditya Chopra) दोघंही तसे माध्यमांपासून दूरच असतात. आदित्य चोप्रा तर कधीच कॅमेऱ्यासमोर येत नाही. राणी मुखर्जी तिच्या सिनेमांच्या प्रमोशननिमित्त दिसते. दरम्यान त्यांची लेक आदिरा जिचा चेहरा आजपर्यंत चाहत्यांनी बघितलेला नाही तिची एक झलक आता समोर आली आहे. अंबानींच्या पार्टीत राणीसोबत आदिराही उभी आहे. तर समोर थलायवा रजनीकांत आहेत. राणी त्यांची आदिराशी ओळख करुन देते आणि रजनीकांतही तिचे लाड करताना दिसत आहेत. राणीने गोल्डन रंगाची साडी नेसली आहे तर आदिरा गुलाबी रंगाच्या सूटमध्ये पाहायला मिळत आहे.
Glimpse of #Thalaivar family met Bollywood actress #RaniMukerji family
— Suresh balaji (@surbalutwt) March 3, 2024
at #AnantRadhikaPreWedding
❤️❤️❤️❤️❤️#Rajinikanth | #Rajinikanth𓃵 | #SuperstarRajinikanth | #superstar@rajinikanth | #AnantAmbani | #anantambaniwedding | #AnantRadhikaCelebrationpic.twitter.com/DP3tSidl87
आदिराला बघून 'ही इतकी मोठी कधी झाली' असाच प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. राणी आणि आदित्य चोप्रा त्यांचं आयुष्य प्रायव्हेटच ठेवतात. त्यामुळेच त्यांनी पापाराझींना कधीच आदिराचे फोटो घेऊ दिले नाहीत आणि कायम नकार दिला. अंबानींच्या पार्टीत मात्र चाहत्यांना तिची झलक दिसलीच.
आदिरा आता ८ वर्षांची आहे. 9 डिसेंबर 2015 रोजी राणीने आदिराला जन्म दिला. राणीची तेव्हा प्री मॅच्योर डिलीव्हरी झाली होती त्यामुळे आदिराला १५ दिवस NICU मध्ये ठेवण्यात आले होते.