भट कंपनीने नाकारलं पण करण जोहरने विश्वास दाखवला, राणी मुखर्जीला असा मिळाला तिचा आवाज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 09:17 AM2023-11-27T09:17:52+5:302023-11-27T09:18:41+5:30

आमिर खान, विक्रम भट आणि मुकेश भट यांना कोणतीच रिस्क घ्यायची नव्हती.

Rani Mukherjee was forbid to use her voice in ghulam movie bhat company did not wanted to take risk | भट कंपनीने नाकारलं पण करण जोहरने विश्वास दाखवला, राणी मुखर्जीला असा मिळाला तिचा आवाज

भट कंपनीने नाकारलं पण करण जोहरने विश्वास दाखवला, राणी मुखर्जीला असा मिळाला तिचा आवाज

अभिनेत्री राणी मुखर्जीचा (Rani Mukherjee) आवाज ही तिची वेगळी ओळख आहे. राणीच्या अभिनयाचे आणि तिच्या आवाजाचे लोक चाहते आहेत. पण एक काळ असा होता जेव्हा राणीला तिच्या आवाजावरुन खूप नावं ठेवली गेली. इतकी की 'गुलाम' सिनेमात तिचा आवाज डब करण्यात आला होता. राणी नुकतीच ५४ व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल २०२३ मध्ये सहभागी झाली होती.

राणी मुखर्जी म्हणाली," 'गुलाम' चे दिग्दर्शक विक्रम भट होते आणि आमिर खान मुख्य अभिनेता होता. आमिर, विक्रम भट आणि निर्माते मुकेश भट यांना असं वाटलं की कदाचित प्रेक्षक माझा घोगरा आवाज स्वीकारणार नाहीत म्हणून फिल्ममध्ये माझा आवाज डब करण्यात आला. हा निर्णय सर्वसहमतीनेच झाला होता. गुलाम माझा दुसरा सिनेमा होता आणि तेव्हा अभिनेत्रींचा आवाज डब करण्याचा ट्रेंड होता. मी पण अगदीच नवीन होते. माझा आवाज असा का आहे हे मी कोणाला समजावून सांगू शकणार नव्हते आणि आमिर, विक्रम, मुकेश भट यांना कोणतीच रिस्क घ्यायची नव्हती."

तर दुसरीकडे राणीला करण जोहरचा 'कुछ कुछ होता है' ऑफर झाला होता. सिनेमाच्या ट्रेलरच्या डबिंगसाठी ती स्टुडिओत पोहोचली तेव्हा करणने तिला विचारलं गुलाममध्ये तू स्वत: डबिंग केलं नाहीस असं ऐकलं. काही प्रॉब्लेम आहे का? मी म्हणाले, नाही काहीच अडचण नाही. तेव्हा करण म्हणाला की मग या सिनेमाचं डबिंग तुझ्यात आवाजात होईल. 

आमिर खान आणि राणी मुखर्जीचा 'गुलाम' 1998 मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमाने अक्षरश: धुमाकूळ घातला होता. सिनेमातील आमिर खानचा ट्रेन सिक्वेन्स खूप सुपरहिट  होता. तसंच 'आती क्या खंडाला' हे गाणं आजही तितकंच लोकप्रिय आहे.

Web Title: Rani Mukherjee was forbid to use her voice in ghulam movie bhat company did not wanted to take risk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.