राणी मुखर्जीचा ‘मर्दानी 2’ बॉक्स ऑफिसवर हिट, पाच दिवसांत कमावले इतके कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 03:01 PM2019-12-18T15:01:07+5:302019-12-18T15:01:29+5:30

पाच दिवसांत रेकॉर्डब्रेक कमाई...

Rani Mukherjee's Mardaani 2 Box Office Collection | राणी मुखर्जीचा ‘मर्दानी 2’ बॉक्स ऑफिसवर हिट, पाच दिवसांत कमावले इतके कोटी

राणी मुखर्जीचा ‘मर्दानी 2’ बॉक्स ऑफिसवर हिट, पाच दिवसांत कमावले इतके कोटी

googlenewsNext
ठळक मुद्देमर्दानी 2’ने 2014 साली आलेला ‘मर्दानी’च्या पहिल्या विकेंडचे कलेक्शन मागे टाकले आहे.

राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी 2’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जोरदार मुसंडी मारत, केवळ पाच दिवसांत 23.65 कोटींची कमाई केली आहे.
2014 साली राणीची प्रमुख भूमिका असलेला ‘मर्दानी’ हा  चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात महिला पोलिस अधिका-याच्या भूमिकेत असलेली राणी सर्वांनाच खूप भावली होती.  बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सुपरहिट ठरलाच पण त्याचबरोबर राणीच्या अभिनयाचेही खूप कौतुक झाले होते. याच चित्रपटाचा सीक्वल असलेला ‘मर्दानी 2’ गत शुक्रवारी प्रदर्शित झाला.



 

यशराज बॅनरखाली बनलेला हा सिनेमा गोपी पुथरन यांनी दिग्दर्शित केला आहे. या सिनेमाने पहिल्या दिवशी 3.80 कोटी रूपयांचे कलेक्शन केले. दुस-या दिवशी म्हणजेच शनिवारी सिनेमाने 6.55 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. तिस-या दिवशी  7 .80 कोटी तर चौथ्या दिवशी 2.85 कोटींचा गल्ला जमवला. मंगळवारी पाचव्या दिवशी 2.65 कोटींची कमाई करत या चित्रपटाने एकूण 23.65 कोटींचा गल्ला जमवला.
‘मर्दानी 2’या सिनेमात राणी मुखजीने आयपीएस अधिकारी शिवानी शिवाजी रॉय अशी भूमिका साकारलीय. ही महिला अधिकारी बलात्कार करणारे आरोपी आणि हत्या करणा-या आरोपींना पकडण्याचे  काम करते. 
राणी मुखर्जीने 2015 मध्ये मुलगी आदिराला जन्म दिला. त्यानंतर तिने सिनेमातून ब्रेक घेतला होता. राणीने तीन वषार्नंतर म्हणजेच 2018 मध्ये ‘हिचकी’ सिनेमातून कमबॅक केले होते. हा सिनेमा बॉक्स आॅफिसवर हिट ठरला होता.

‘मर्दानी’च्या तुलनेत जास्त कमाई 
मर्दानी 2’ने 2014 साली आलेला ‘मर्दानी’च्या पहिल्या विकेंडचे कलेक्शन मागे टाकले आहे. 2014 मध्ये आलेल्या ‘मर्दानी’ने पहिल्या आठवड्यात 14.46 कोटींचे कलेक्शन केले होते. याव्यतिरिक्त 2018 आलेला राणीचा ‘हिचकी’ सिनेमाने 15.35 कोटींची कमाई केली होती.

Web Title: Rani Mukherjee's Mardaani 2 Box Office Collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.