Video : रानू मंडलचा आवाज ऐकला, आता या मुलीचा आवाज ऐका...!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 12:40 PM2019-09-20T12:40:53+5:302019-09-20T12:42:06+5:30

या मुलीचा आवाज इतका दमदार आहे की, ऐकणारा प्रत्येकजण थक्क होईल.

ranu mandal and now little girl singing video is going viral on youtube instagram punjabi song zindagi tere naal | Video : रानू मंडलचा आवाज ऐकला, आता या मुलीचा आवाज ऐका...!

Video : रानू मंडलचा आवाज ऐकला, आता या मुलीचा आवाज ऐका...!

googlenewsNext
ठळक मुद्देरानू मंडलने हिमेश रेशमियाच्या ‘हॅपी हार्डी और हीर’ या आगामी चित्रपटासाठी तीन गाणी गायलीत. यापैकी ‘तेरी मेरी कहानी’ हे रानूने गायलेले पहिले गाणे रिलीज झाले आहे.

कधीकाळी रेल्वे स्टेशनवर गात भीक मागणारी रानू मंडल आज एक स्टार बनली आहे. तिच्या जादुई आवाजाने लोकांना असे काही वेड लावले की, एका व्हायरल व्हिडीओने ती एका रात्रीत इंटरनेट सेन्सेशन बनली. नशीबाने साथ दिली आणि हिमेश रेशमियाने पहिला ब्रेक.  हेच कारण आहे की, रानू मंडल हिच्या पाठोपाठ सोशल मीडियावर झगमगाटापासून दूर असलेल्या अनेक कलाकारांचे टॅलेंट समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी एक कॅब ड्राईव्हरचा गातांनाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता एका लहान मुलीचा व्हिडीओ असाच व्हायरल होतोय. या मुलीचा आवाज इतका दमदार आहे की, ऐकणारा प्रत्येकजण थक्क होईल.


व्हिडीओतील ही मुलगी लोककलाकारांच्या एका ग्रूपचा भाग आहे. एका इव्हेंटमध्ये आपल्या टीमसोबत ती गात आहे. ‘जिंदगी है तेरे नाल’ असे हे गाणे आहे. इतक्या कमी वयात तिचा इतका दमदार आवाज ऐकून प्रत्येकजण अवाक् झाला आणि तिचा व्हिडीओ क्षणात व्हायरल झाला.अर्थात या मुलीचे नाव काय, ती कुठली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
रानू मंडलने हिमेश रेशमियाच्या ‘हॅपी हार्डी और हीर’ या आगामी चित्रपटासाठी तीन गाणी गायलीत. यापैकी ‘तेरी मेरी कहानी’ हे रानूने गायलेले पहिले गाणे रिलीज झाले आहे. हे गाणे लोकांना प्रचंड आवडले. आता तर दिग्गज गायक कुमार साून यांनीही रानूसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एकंदर काय तर रानूचे नशीब फळफळले. आता तिच्यासारखेच अनेक प्रतिभावान कलाकार अजूनही संधीच्या शोधात आहेत.

Web Title: ranu mandal and now little girl singing video is going viral on youtube instagram punjabi song zindagi tere naal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.