रानू मंडल पुन्हा एकदा आली चर्चेत, आता सोशल मीडियावर हा व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 11:52 AM2021-11-11T11:52:09+5:302021-11-11T11:53:13+5:30

रानू मंडल एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

Ranu Mandal is back in the spotlight, now this video is going viral on social media | रानू मंडल पुन्हा एकदा आली चर्चेत, आता सोशल मीडियावर हा व्हिडीओ होतोय व्हायरल

रानू मंडल पुन्हा एकदा आली चर्चेत, आता सोशल मीडियावर हा व्हिडीओ होतोय व्हायरल

googlenewsNext

सोशल मीडियाच्या माध्यमातून बरेच जण प्रकाशझोतात आले. ज्यांना एका रात्रीत खूप लोकप्रियता मिळाली. याचे मोठे उदाहरण म्हणजे रानू मंडल. रानू मंडलच्या सुरेल आवाजाने देशभरातील अनेक लोकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. इतकेच नाही तर तिला बॉलिवूडचा प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आणि गायक हिमेश रेशमिया सोबत गाण्याची संधी मिळाली. रेल्वे स्टेशनवर गाणे गाऊन भीक मागणाऱ्या रानूला त्यानंतर खूप प्रसिद्धी मिळाली. मात्र तिला ही प्रसिद्धी टिकवता आली नाही. तिच्या डोक्यात हवा गेली आणि तिचा उद्धटपणा तिला भोवला. परिणामी तिच्यावर पुन्हा रेल्वे स्टेशनवर गाणे गाण्याची वेळ आली. तरीदेखील ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते. दरम्यान आता तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

रानू मंडलचे छठ पूजेचे गाणे व्हायरल होत आहे. बिहार आणि बंगालच्या काही भागामध्ये छठ पूजा साजरी केली. त्यामुळे संपूर्ण परिसरात छठचे गीत मोठ्या प्रमाणात ऐकले जात आहेत. अशातच रानू मंडलचा आवाज असल्याचे सांगून एक गाणे व्हायरल होताना दिसत आहे. मात्र, प्रत्यक्षात व्हायरल झालेले छठचे गाणे तिच्या आवाजातील नाही, असे लोकांचे म्हणणे आहे. या प्रकारामुळे लोक वैतागले आहेत. व्हिडीओच्या कव्हर फोटोवर राणू मंडलचे नाव का वापरले गेले? असा प्रश्न लोक सोशल मीडियावर विचारत आहेत.


रानू मंडलच्या नावाने प्रमोट होत असलेले हे गाणं यूट्यूबवर चांगलंच व्हायरल होत आहे. हा आवाज रानू मंडलचा नसल्याचे सोशल मीडियावरील अनेक युजर्स म्हणत आहेत. 

Web Title: Ranu Mandal is back in the spotlight, now this video is going viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.