एका रात्रीत लोकप्रिय झालेल्या रानू मंडलच्या पहिल्या गाण्याचा टीझर झाला रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 08:04 PM2019-09-10T20:04:20+5:302019-09-10T20:04:35+5:30
सोशल मीडियाच्या माध्यमातून जगासमोर आलेल्या रानू मंडल यांना हिमेश रेशमियाने पार्श्वगायनात पहिला ब्रेक दिला. यानंतर रानू मंडल एका रात्रीत स्टार बनल्या.
सोशल मीडियावर सध्या एका गायिकेची जोरदार चर्चा आहे. तिच्या सुरेल आवाजातलं 'एक प्यार का नगमा' असं काही सुपरहिट झालं की प्रत्येकाच्या काळजाचा ठाव घेतला. ही गोड गळ्याची गायिका म्हणजे कधी काळी रानाघाटच्या रेल्वे स्टेशनवर गाणं गात भीक मागणारी रानू मंडल. सोशल मीडियाच्या माध्यमातून जगासमोर आलेल्या रानू मंडल यांना हिमेश रेशमियाने पार्श्वगायनात पहिला ब्रेक दिला. यानंतर रानू मंडल एका रात्रीत स्टार बनल्या. कधी भीक मागताना गाणं गाणारी व्यक्ती थेट बॉलिवूडमध्ये पोहोचू शकेल हा विचार रानू मंडल यांनी स्वप्नातही विचार केला नसेल.
हिमेशच्या या आगामी चित्रपटाचं नाव आहे हॅप्पी हार्डी अँड हीर. यात रानूने तेरी मेरी कहानी असं बोल असणारं गाणं गायलं आहे. नुकताच रानू मंडल यांचं पहिलं गाणं 'तेरी मेरी कहानी'चा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. हे गाणं तिने हिमेश रेशमियासोबत गायलं आहे. या टीझरमध्ये रानू मंडलच्या व्हायरल व्हिडिओची क्लिपदेखील दाखवण्यात आली आहे. हे गाणं उद्या प्रदर्शित होणार आहे.
रानू पश्चिम बंगालच्या रानाघाट स्टेशनव गाणी गात स्वत:च पोट भरत असे. अनेक जण तिच्या मधूर आवाजाने मंत्रमुग्ध होत. काहीजण तिचे कौतुक करत तर काही जण तिच्या हातात चार-दोन रूपये टिकवून पुढे चालते होत. पण एतींद्र चक्रवर्तीने एक दिवस रस्त्यावर गाणाºया रानूला गाताना बघितले आणि तिचा गातानाचा व्हिडीओ घेतला.
रानू लता मंगेशकर यांचे ‘एक प्यार का नगमा’ हे गीत गात होती. एतींद्रने तिचा व्हिडीओ बनवला आणि आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला. तो इतका व्हायरल झाला की, या व्हिडीओने रानूचे आयुष्य बदलले.