रानू मंडलला लागली लॉटरी, हिमेश रेशमियानंतर आता या कलाकाराने दिली तिला संधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 14:03 IST2022-04-20T14:03:05+5:302022-04-20T14:03:25+5:30
Ranu Mandal New Song: इंटरनेटवर रातोरात अधिराज्य गाजवणारी गायिका राणू मंडलचे पुन्हा एकदा नवीन गाणे समोर आले आहे. या व्हिडीओला खूप पसंती मिळते आहे.

रानू मंडलला लागली लॉटरी, हिमेश रेशमियानंतर आता या कलाकाराने दिली तिला संधी
इंटरनेट सेन्सेशन राणू मंडल (Ranu Mandal)च्या नवीन गाण्याचा व्हिडीओ समोर आला आहे. बॉलिवूड सिंगर हिमेश रेशमिया(Himesh Reshmiya)नंतर आता ती बांगलादेशी सुपरस्टार हिरो अलोम(Alom)सोबत गाताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी, अलोमने त्याच्या 'तुम चारा आमी' गाण्याच्या रेकॉर्डिंग सत्रातील एक व्हिडिओ शेअर केला होता, जो यूट्यूबवर व्हायरल झाला होता. एका रिपोर्टनुसार, बांगलादेशातील लोकप्रिय व्यक्तिमत्व हिरो आलोमने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये रानू मंडलसोबत काम करण्याची घोषणा केली होती.
अलोमने युट्यूबवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, ते दोघे त्यांचे पहिले गाणे रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करताना दिसत आहेत. दोन्ही गायक लाल रंगाचे कपडे परिधान करून एकत्र मधुर गाणी गाताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि रानू मंडलला पुन्हा एकदा इंटरनेटवर पाहून लोकांना आनंद झाला आहे. अनेकांनी अभिनंदन आणि प्रोत्साहनपर कमेंट केली आहे. तर काहींनी तिला नेहमीप्रमाणे ट्रोल केले.
एका यूजरने लिहिले की, 'बंगालचे लोक ज्याची वाट पाहत होते ते आता पूर्ण झाले आहे. हिरो आलम आणि त्याची टीम अशीच पुढे जात रहा!' आणखी एका यूजरने लिहिले की, 'राणू मंडल हिरो अलमसोबत खूप छान दिसत आहे. या दोघांनीही एकमेकांशी जोडले जावे आणि अशा अनेक गाण्यांची निर्मिती करत राहावे अशी माझी इच्छा आहे.