रणवीर नाही ब्रँडोहोलिक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2016 05:18 PM2016-02-20T17:18:47+5:302016-02-20T10:23:44+5:30
कपडे, स्टाईल, फॅशन, लूक, पर्सनालिटी ही आजच्या तरुणाईची शब्दावली. कुठल्याही कॉलेज कट्ट्यावर हे शब्द तुम्हाला सहज ऐकू येतील. आजकाल ...
क डे, स्टाईल, फॅशन, लूक, पर्सनालिटी ही आजच्या तरुणाईची शब्दावली. कुठल्याही कॉलेज कट्ट्यावर हे शब्द तुम्हाला सहज ऐकू येतील.
आजकाल केवळ मुलीच नाही तर मुलंदेखील तितकीच स्वत:च्या दिसण्याकडे लक्ष देतात. कोणती स्टाईल इन आणि कोणती आऊटडेटेड याकडे त्यांचा डोळा असतो. यामुळे मोठमोठ्या ब्रँड्सचे चांगलेच फावले. मॉल आणि आॅनलाईन शॉपिंगमुळे तरुणाईचा केवळ ब्रँडेड कपडे खरेदी करण्याकडे कल वाढला आहे.
मात्र, फॅशन आयकॉन आणि बॉलिवूड सुपरस्टार रणवीर सिंग याला अपवाद आहे. त्याला म्हणे कपडे कसे दिसतात याच्याशी मतलब. बाकी ब्रँड कोणता याच्याशी त्याला काही देणं घेणं नाही.
तो म्हणतो, मी ब्रँडोहोलिक नाही. एखादा शर्ट किंवा पँट मला कशी दिसते हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे. पण सगळ्या बँ्रड्सबद्दल मी अपटूडेट माहिती ठेवतो. शेवटी चांगले दिसायला कोणाला आवडत नाही?
रणवीर सिंगचे करिअर सध्या रॉकेट स्पीडने वर जात आहे. ‘बाजीराव मस्तानी’ने समीक्षक आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्यामुळे बॉक्स आॅफिसवर चांगलाच गल्ला जमवला.
त्याची पुढची फिल्म यशराज स्टुडिओचा सर्वेसर्वा आदित्य चोपडा कमबॅक करत असलेली ‘बेफिक्रे’ आहे. वाणी कपूर त्याची को-स्टार आहे. शाहरुखला सोडून आदित्य प्रथमच चित्रपट बनवत आहे आणि त्यात रणवीरला रोल मिळणे ही त्याच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे.
Main Photo Credit : GQ