रणवीर सिंग-शाहिद कपूरमध्ये वादाची ठिणगी ?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2018 08:18 AM2018-02-05T08:18:50+5:302018-02-05T13:48:50+5:30
संजय लीला भन्साळी यांचे चित्रपट अनेक कारणांमुळे चर्चेत राहिला. चित्रपट रिलीज झाल्यानंतर आणखीन एक वाद समोर आला आहे. चित्रपटातील ...
स जय लीला भन्साळी यांचे चित्रपट अनेक कारणांमुळे चर्चेत राहिला. चित्रपट रिलीज झाल्यानंतर आणखीन एक वाद समोर आला आहे. चित्रपटातील दोन अभिनेते रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांच्या वाद आता चव्हाट्यावर आला आहे. चित्रपटात तर दोघे एकमेकांच्या समोर उभे राहिले होते मात्र आता खऱ्या आयुष्यातही दोघांमध्ये कोल्ड वॉर असल्याची चर्चा आहे. एका इंटरव्ह्रु दरम्यान शाहिद कपूरला विचारण्यात आले की तुला चित्रपटातील खिल्जीची भूमिका साकारायला आवडली असती का?, यावर शाहिदने उत्तर दिले का नाही, कोण असा अभिनेता असेल ज्याला खिल्जीची भूमिका साकारायला आवडणार नाही.
कॉफी विथ करनमध्ये म्हटले होते की कमीनेमध्ये शाहिद कपूरने माझापेक्षा चांगला अभिनय केला आहे. मी पद्मावतमध्ये खिल्जीची भूमिका वेगळ्या पद्धतीने साकारली आहे. बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार शाहिदला जेव्हा खिल्जीच्या भूमिकेबाबत विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला की, मला या सगळ्या गोष्टींच्या डिटेल्समध्ये जायचे नाही. चित्रपटाचे पहिले हिरो संजय लीला भन्साळी असतात मग बाकीचे सगळे हे कायम लक्षात राहिले पाहिजे. आम्ही दोघांनी वेगवेगळ्या पद्धतीने अभिनय केला कारण आम्ही दोघे वेगगेवळी माणसं आहोत. जेव्हा त्याला पद्मावतच्या सेटवर रणवीर सिंगसोबतच्या भेटीबाबत प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी तो म्हणाला, मी रावल रतन सिंगच्या भूमिकेत होते. मी सीनच्यामध्ये गाणी ऐकत बसायचो.
ALSO READ : SEE PIC : रणवीर सिंगला पाहून तुम्हीही म्हणाल, कुठे तो ‘खिल्जी’ अन् कुठे हा ‘गली बॉय’?
मात्र काहीही असो पद्मावत चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात १०६ कोटी रुपयांची कमाई केली. दोन आठवड्यात चित्रपटाने वर्ल्डवाइड ग्रॉस कलेक्शन ३०० कोटींपेक्षा अधिक केले आहे, तर देशांतर्गत आतापर्यंतची कमाई १५५ कोटी इतकी आहे. तर रिलीजच्या पहिल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी १९ कोटी, शुक्रवारी ३२ कोटी, शनिवारी २७ कोटी, रविवारी ३१ कोटी, सोमवारी १५ कोटी, मंगळवारी १४ कोटी, बुधवारी १२ कोटी अशाप्रकारे चित्रपटाने आतापर्यंत कमाई केली आहे.