रणवीर सिंगचा पहिला पाकिस्तानी चित्रपट बॉक्सआॅफिसवर करतोय धूम!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2018 01:39 PM2018-07-24T13:39:04+5:302018-07-24T13:45:02+5:30

बॉलिवूडचा ‘बाजीराव’ रणवीर सिंग याचा पाकिस्तानी चित्रपट सध्या पाकिस्तानात धूम करतोय. होय, हे खरे आहे़ रणवीरने पहिल्यांदा एका पाकिस्तानी चित्रपटात काम केले आहे आणि या चित्रपटाचे नाव आहे, ‘तीफा इन ट्रबल’. 

ranveer singh in ali zafar pakistani film teefa in trouble | रणवीर सिंगचा पहिला पाकिस्तानी चित्रपट बॉक्सआॅफिसवर करतोय धूम!!

रणवीर सिंगचा पहिला पाकिस्तानी चित्रपट बॉक्सआॅफिसवर करतोय धूम!!

googlenewsNext

बॉलिवूडचा ‘बाजीराव’ रणवीर सिंग याचा पाकिस्तानी चित्रपट सध्या पाकिस्तानात धूम करतोय. होय, हे खरे आहे़ रणवीरने पहिल्यांदा एका पाकिस्तानी चित्रपटात काम केले आहे आणि या चित्रपटाचे नाव आहे, ‘तीफा इन ट्रबल’. पाकी अभिनेता अली जफर यात मुख्य भूमिकेत आहे. आता अली जफर मुख्य भूमिकेत म्हटल्यावर रणवीरने यात काय केले, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर रणवीर यात एका अतिथी भूमिकेत आहे. म्हणजे, यात तो कॅमिओ करताना दिसतोय. हा चित्रपट पाकिस्तानात रिलीज झालाय आणि बॉक्सआॅफिसवर धूम करतोय.'



 

 रणवीर व अली जफरच्या या चित्रपटाने पाकिस्तानी बॉक्सआॅफिसवर तीन दिवसांत ७.२ कोटी  कमावले आहेत. पाकिस्तानी चित्रपटासाठी हा मोठा विक्रम आहे. अद्याप हा चित्रपट भारतात रिलीज झालेला नाही. पण भारतातही हा चित्रपट प्रदर्शित व्हावा, अशी आशा अली जफरने व्यक्त केली आहे.
‘तीफा इन ट्रबल’ हा चित्रपट एका तरूणाच्या स्वप्नपूर्तीचा प्रवास आहे. ही भूमिका अली जफरने साकारली आहे. रणवीर सिंग सरप्राईज एन्ट्री घेऊन अलीच्या स्वप्नांना नवे पंख देतो, असे यात दाखवण्यात आले आहे. तसे पाहता, अली जफर व रणवीर या जोडीचा हा पहिला चित्रपट नाही. याआधी ‘किल दिल’मध्ये रणवीर व अली जफर एकत्र दिसले होते.
आजपर्यंत अनेक भारतीय कलाकारांनी पाकिस्तानी चित्रपटांत काम केले आहे. सर्वप्रथम १९५७ मध्ये शेहला रेहमानी हिने पाकिस्तानी चित्रपटात काम केले होते. यापश्चात नसीरूद्दीन शाह, किरण खेर, अरबाज खान, नेहा धूपिया, जॉनी लिवर आदी कलाकारांनी पाकिस्तानी चित्रपटात काम केले आहे.

 

Web Title: ranveer singh in ali zafar pakistani film teefa in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.