Box Office Collection : ‘गली बॉय’ची बक्कळ कमाई, चार दिवसांत कमावले इतके कोटी!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 01:27 PM2019-02-18T13:27:53+5:302019-02-18T13:49:01+5:30
रणवीर सिंग आणि सुपरहिट असे नवे समीकरण सध्या बनू पाहतेय. याला कारण म्हणजे, रणवीरचा लागोपाठ तिसरा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धूम करतोय.
रणवीर सिंग आणि सुपरहिट असे नवे समीकरण सध्या बनू पाहतेय. याला कारण म्हणजे, रणवीरचा लागोपाठ तिसरा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धूम करतोय. होय, रणवीरचा ‘गली बॉय’ रिलीज झाला आणि या चित्रपटावर प्रेक्षकांच्या उड्या पडल्या. गेल्या चार दिवसांत या चित्रपटात ७० कोटींचा आकडा पार केलाय, तो म्हणूनच.
ट्रेड एक्स्पर्ट तरण आदर्श यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, रिलीजच्या पहिल्या दिवशी या चित्रपटाने १९.४० कोटींची कमाई केली. दुसºया दिवशी १३.१० कोटींचा गल्ला जमवला. यानंतर शनिवारी १८.६५ कोटींचा आकडा पार केला आणि काल रविवारी २१.३० कोटींचा बिझनेस करत थेट ७२.४५ कोटींपर्यंत मजल मारली. केवळ चार दिवसांत ७० कोटींची कमाई करणाºया ‘गली बॉय’ने याच आठवड्यात १०० कोटींचा आकडा गाठला तर नवल वाटायला नको.
#GullyBoy has excellent *extended* weekend... Will cross ₹ 75 cr today [Mon]... Metros exceptional... Mumbai circuit terrific... Tier-2 cities pick up... Metros to trend strongly on weekdays... Thu 19.40 cr, Fri 13.10 cr, Sat 18.65 cr, Sun 21.30 cr. Total: ₹ 72.45 cr. India biz
— taran adarsh (@taran_adarsh) February 18, 2019
‘गली बॉय’ हा रणवीरचा सलग तिसरा हिट चित्रपट आहे. गतवर्षी त्याचे ‘पद्मावत’ आणि ‘सिम्बा’ असे दोन चित्रपट रिलीज झालेत आणि या दोन्ही चित्रपटाने धुव्वाधार कमाई केली. आता रणवीरचा तिसरा चित्रपट ‘गली बॉय’ हाही सुपरडुपर हिट ठरतोय. मुंबईच्या एका सामान्य रॅपरच्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट विदेशातही बक्कळ कमाई करतोय.
#GullyBoy benchmarks...
— taran adarsh (@taran_adarsh) February 18, 2019
Crossed ₹ 50 cr: Day 3
₹ 75 cr: Will cross on Day 5 [Mon]
Will cross *lifetime biz* of Zoya Akhtar’s #DilDhadakneDo [₹ 76.88 cr] on Day 5 and #ZindagiNaMilegiDobara [₹ 90.27 cr; Zoya’s highest grossing film] in Week 1 itself. India biz.
रणवीरने यात शानदार अभिनय केला आहे. रणवीरच्या अपोझिट दिसलेली आलिया भट्ट हिनेही आपल्या शानदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. इतकी की, ‘गली बॉय’ हा रणवीर व आलियाच्या करिअरमधील सर्वोत्तम चित्रपट आहे, असे समीक्षकांनी म्हटले आहे. दिग्दर्शिका झोया अख्तरने या चित्रपटात धारावीत जगणा-या मुलांची कथा पडद्यावर चितारली आहे.