रणवीर सिंग-आलिया भटची दमदार केमिस्ट्री, 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चा ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 01:48 PM2023-07-04T13:48:21+5:302023-07-04T13:48:50+5:30

Rocky Aur Rani Kii Prem Kahaani trailer : आलिया भट आणि रणवीर सिंग यांच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

Ranveer Singh-Alia Bhatt's powerful chemistry, 'Rocky Aur Rani Ki Prem Kahani' trailer released | रणवीर सिंग-आलिया भटची दमदार केमिस्ट्री, 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चा ट्रेलर रिलीज

रणवीर सिंग-आलिया भटची दमदार केमिस्ट्री, 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चा ट्रेलर रिलीज

googlenewsNext

आलिया भट (Alia Bhatt) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) यांच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Kii Prem Kahaani) या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट करण जोहरने दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात आलिया आणि रणवीरशिवाय शबाना आझमी, धर्मेंद्र आणि जया बच्चन देखील दिसणार आहेत. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' २८ जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आलिया भटने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. 

चित्रपटाची कथा रॉकी म्हणजेच रणवीर सिंग आणि राणी म्हणजेच आलिया भट यांची आहे. दोघेही प्रेम करतात. पण दोघांचे कुटुंब पूर्णपणे वेगळे आहे. राणी बंगाली कुटुंबातील आहे तर रॉकी पंजाबी कुटुंबातील आहे. आता दोन्ही कुटुंब पेच प्रसंगात अडकतात, मग दोघेही एकमेकांच्या कुटुंबासोबत तीन महिने राहायला तयार होतात. हाच किस्सा ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे.

करण जोहरने 'रॉकी आणि रानी की प्रेम कहानी' दिग्दर्शित केला आहे, त्यामुळे त्याचा स्पर्श त्यात स्पष्टपणे दिसतो. श्रीमंत लोक, नेत्रदीपक दृश्ये आणि सर्व काही ट्रेलरमध्ये दृश्यमान आहे जे खानदानीपणा दर्शवतो. मात्र, ट्रेलरमध्ये आलिया भट आणि रणवीर सिंगची केमिस्ट्री पाहून ‘गली बॉय’ची आठवण होते. अशाप्रकारे हा चित्रपट कुटुंब बदलण्याबाबत असल्याचे दिसते. ही संकल्पना फारशी नवीन नाही, पण करण जोहर त्यातून काहीतरी नवीन कसे दाखवतो हे पाहावे लागेल.

करण जोहरचं ७ वर्षानंतर रुपेर पडद्यावर कमबॅक

करण जोहरचा दिग्दर्शक म्हणून शेवटचा चित्रपट २०१६ मध्ये प्रदर्शित झालेला ए दिल है मुश्किल होता. यानंतर त्याने लस्ट स्टोरीज आणि घोस्ट स्टोरीजसाठी प्रत्येकी एक सेगमेंट दिग्दर्शित केले. पण तो तब्बल सात वर्षांनी दिग्दर्शक म्हणून चित्रपट घेऊन परतला आहे.

Web Title: Ranveer Singh-Alia Bhatt's powerful chemistry, 'Rocky Aur Rani Ki Prem Kahani' trailer released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.