'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चा BTS व्हिडीओ व्हायरल, रणवीर-आलिया पुन्हा धमाक्यासाठी तयार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 18:38 IST2021-11-29T18:35:50+5:302021-11-29T18:38:21+5:30
Rocky Aur Rani Ki Prem Kahani BTS Video : काही दिवसांपूर्वीच या सिनेमातील रणवीर (Ranveer Singh) आणि आलियाचे (Alia Bhatt) फोटो व्हायरल झाले होते. आता या सिनेमाचा BTS व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चा BTS व्हिडीओ व्हायरल, रणवीर-आलिया पुन्हा धमाक्यासाठी तयार
‘गली बॉय’ नंतर पुन्हा एकद रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt)ची जोडी धमाका करण्यासाठी तयार आहे. करण जोहर दिग्दर्शित करत असलेल्या आगामी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी (Rocky Aur Rani Ki Prem Kahani)’ मध्ये दोघे पुन्हा एकत्र दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वीच या सिनेमातील रणवीर आणि आलियाचे फोटो व्हायरल झाले होते. आता या सिनेमाचा BTS व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
या सिनेमाचं ५० दिवसांचं शूटींग पूर्ण झालं आहे आणि आता धर्मा प्रॉडक्शनने सिनेमाच्या रिलीज डेटचाही खुलासा केला आहे. सिनेमाच्या बीटीएस व्हिडीओत रणवीर-आलिया यांच्यात रोमॅंटिक आणि सिजलिंग केमिस्ट्री असल्याचं दिसत आहे. त्यामुळे सिनेमाची उत्सुकता वाढत आहे.
व्हिडीओत रणवीर सिंह आणि आलिया भट्ट यांच्यातील केमिस्ट्री स्टष्टपण दिसत आहे. बीटीएस व्हिडीओत आलिया ग्रीन साडीत दिसली आहे. व्हिडीओवरून अंदाज लावला जाऊ शकतो की, प्रेक्षकांचं या सिनेमातून भरभरून मनोरंजन होणार आहे. त्यांना यात भरपूर रोमान्स, ड्रामा बघायला मिळणार आहे. ‘
'रॉकी और रानी की प्रेम कहानी’ च्या काही भागाचं शूटींग दिल्लीमद्ये झालं आहे. ज्यामुळे काही दिवसांपासून सिनेमाचे स्टार पूर्ण टीमसोबत दिल्लीत आहे. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरलही झाले आहेत. या फोटोंमध्ये आलिया, रणवीर, शबाना आझमी, धर्मेंद्र आणि करण जोहर दिसत आहे.