'मन्नत'च्या बाजूलाच बनतोय दीपवीरचा 'आशियाना', 119 कोटी रुपयांत खरेदी केलं होतं अपार्टमेंट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 01:10 PM2023-06-12T13:10:23+5:302023-06-12T13:11:15+5:30

बांद्राच्या बँडस्टँड या अतिउच्च परिसरात सागर रेशम या इमारतीत त्यांनी फ्लॅट खरेदी केले आहेत.

ranveer singh and deepika padukone going to be neighbours of shahrukh khan as the bought new house in bandstand for 119cr of value | 'मन्नत'च्या बाजूलाच बनतोय दीपवीरचा 'आशियाना', 119 कोटी रुपयांत खरेदी केलं होतं अपार्टमेंट

'मन्नत'च्या बाजूलाच बनतोय दीपवीरचा 'आशियाना', 119 कोटी रुपयांत खरेदी केलं होतं अपार्टमेंट

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) लवकरच त्यांच्या नवीन घरात राहायला जाणार आहेत. माध्यम रिपोर्ट्सनुसार, दोघेही याचवर्षी नव्या घरात शिफ्ट होतील. विशेष म्हणजे या स्टार कपलचा 'आशियाना' शाहरुखच्या (Shahrukh Khan) 'मन्नत' बंगल्याच्या जवळच आहे. 

रणवीर आणि दीपिका नुकतेच कन्स्ट्रक्शन साईटवर पोहोचल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बांद्राच्या बँडस्टँड या अतिउच्च परिसरात सागर रेशम या इमारतीत त्यांनी फ्लॅट खरेदी केले आहेत.  त्यांनी एकूण चार मजले खरेदी केले असून याची किंमत जवळपास 119 कोटी रुपये इतकी आहे.  16 ते 19 हे चार मजले स्टार कपलने खरेदी केले आहेत. तर अपार्टमेंटच्या बाकी मजल्यांवर आधीपासूनच इतर लोक राहत आहेत. 16 व्या मजल्यावर त्यांनी चार बेडरुमचे घर बनवले आहे. तर 17 ते 19 मजल्यांवर पेंटहाऊसचे काम सुरु आहे.

रणवीर-दीपिकाची केवळ बांद्रातच नाही तर मुंबईच्या इतरही भागात प्रॉपर्टी आहे. 2021 मध्ये त्यांनी अलिबाग येथे 22 कोटींचा बंगला खरेदी केला. प्रभादेवीच्या ब्यूमॉंड टॉवरमध्येही त्यांचं 40 कोटींचं अपार्टमेंट आहे. याशिवाय खारमध्ये त्यांचं शानदार घर आहे.

Web Title: ranveer singh and deepika padukone going to be neighbours of shahrukh khan as the bought new house in bandstand for 119cr of value

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.