​ रणवीर सिंग अन् शाहिद कपूर आहेत नाराज! दीपिका पादुकोणने असे दिले उत्तर !!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2017 07:36 AM2017-11-19T07:36:48+5:302017-11-19T13:11:52+5:30

दीपिका पादुकोण सध्या चर्चेत आहे. दुर्देवाने चांगल्या नाही तर काहीशा वाईट कारणाने. दीपिकाचा ‘पद्मावती’ हा आगामी चित्रपट सध्या वादात ...

Ranveer Singh and Shahid Kapoor are angry! Deepika Padukone answered the answer !! | ​ रणवीर सिंग अन् शाहिद कपूर आहेत नाराज! दीपिका पादुकोणने असे दिले उत्तर !!

​ रणवीर सिंग अन् शाहिद कपूर आहेत नाराज! दीपिका पादुकोणने असे दिले उत्तर !!

googlenewsNext
पिका पादुकोण सध्या चर्चेत आहे. दुर्देवाने चांगल्या नाही तर काहीशा वाईट कारणाने. दीपिकाचा ‘पद्मावती’ हा आगामी चित्रपट सध्या वादात सापडला आहे. केवळ वादातचं नाही तर चित्रपटाचे रिलीजही वांद्यात सापडले आहे. याच वादाच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटातील लीड अ‍ॅक्टर रणवीर सिंग आणि शाहिद कपूर हे दोघे दीपिकावर नाराज असल्याची चर्चा आहे.



दीपिकाने अलीकडे ‘पद्मावती’ला विरोध करणा-यांना सुनावले होते. ‘पद्मावती’ कुठल्याही स्थितीत रिलीज होणारच, असे तिने ठणकावले होते.  आम्ही खूप मोठी लढाई सुरु केली आहे. काहीही झाले तरी ‘पद्मावती’ सिनेमा ठरलेल्या रिलीज होणारच,  आम्ही केवळ सेन्सॉर बोडार्ला उत्तर देण्यास बांधिल आहोत.  या सिनेमाचे प्रदर्शन कोणीही अडवू शकत नाही, असे दीपिका म्हणाली होती. दीपिकाच्या या निवार्णीच्या भाषेने करणी सेना संतापली आहे.   केवळ राजपूत समाजच नव्हे तर हिंदू आणि मुस्लिमही या सिनेमाच्या विरोधात असल्याचा दावा या संघटनेने केला आहे. या सिनेमाचे ट्रेलर ज्या चित्रपटगृहांत दाखवले जातील, तिथे जाळपोळ करु, अशी धमकीही त्यांनी दिली आहे. या धमकीनंतर दीपिकाला सुरक्षा पुरवण्यात आली आहे आणि नेमक्या याच धमकीप्रकरणामुळे रणवीर व शाहिद नाराज आहेत. ‘पद्मावती’च्या प्रेस कॉन्फरन्सला जाताना दीपिकाने आम्हाला सांगितलेदेखील नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे रणवीर व शाहिदच्या या नाराजीवर दीपिका काय उत्तर देते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

ALSO READ :​शूर्पणखेसारखे तुझेही नाक कापू! करणी सेनेने दिली दीपिका पादुकोणला धमकी!!

अलीकडे एका मुलाखतीत दीपिका रिअ‍ॅक्ट झाली. ‘हे सगळे बालीशपणाचे आहे. मी इथे आहे आणि इथे बसण्याचे मला स्पष्टीकरण द्यावे लागत असेल तर ते दुर्दैवी आहे. ‘पद्मावती’च्या ३ डी ट्रेलर लॉन्चला मी हजर होते कारण माझ्या डायरेक्टरनी मला तिथे हजर राहण्याचे निर्देश दिले होते. मी तिथे  असणे त्यांच्यासाठी आवश्यक होते. चित्रपटाचे अखेरच्या टप्प्याचे शूटींग सुुरू होते आणि अशास्थितीत त्यांनी मला याठिकाणी जाण्यास सांगितले. अखेरच्या टप्प्यात एक एक दिवस किती महत्त्वाचा असतो, हे तुम्ही समजू शकता.  त्यामुळेच त्यांनी मी या इव्हेंटला असावे, असे भन्साळींना वाटले आणि मी केवळ त्यांचे निर्देश पाळले,’ असे दीपिका म्हणाली. आता दीपिकाच्या या खुलाशावर रणवीर व शाहिद काय म्हणतात, ते बघूच.

Web Title: Ranveer Singh and Shahid Kapoor are angry! Deepika Padukone answered the answer !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.