​रणवीर सिंगवर नाराज आहेत संजय लीला भन्साळी! कारण वाचून बसेल धक्का!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2017 07:07 AM2017-12-06T07:07:53+5:302017-12-06T12:47:02+5:30

होय, ऐकता ते खरे आहे. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी अभिनेता रणवीर सिंगवर नाराज असल्याची खबर आहे. रणवीरसोबत भन्साळींनी ‘गोलियों ...

Ranveer Singh is angry with Sanjay Leela Bhansali! Pushing due to basel reading !! | ​रणवीर सिंगवर नाराज आहेत संजय लीला भन्साळी! कारण वाचून बसेल धक्का!!

​रणवीर सिंगवर नाराज आहेत संजय लीला भन्साळी! कारण वाचून बसेल धक्का!!

googlenewsNext
य, ऐकता ते खरे आहे. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी अभिनेता रणवीर सिंगवर नाराज असल्याची खबर आहे. रणवीरसोबत भन्साळींनी ‘गोलियों की रासलीला : राम लीला’,‘बाजीराव मस्तानी’,‘पद्मावती’ अशा तीन चित्रपटांत काम केले आहे. पण आता हेच भन्साळी आपल्या आवडत्या अभिनेत्यावर नाराज असल्याची खबर आहे. विशेष म्हणजे, या नाराजीमागचे कारणही बरेच शॉकिंग आहे. रणवीरचा उथळ स्वभाव तूर्तास भन्साळींना खटकू लागला आहे. अर्थात त्यामागेही एक कारण आहे. हे कारण आहे ‘पद्मावती’. 

ताजी खबर खरी मानाल तर, भन्साळींनी रणवीरला फोन करून स्पष्ट शब्दांत एक गोष्ट बजावलीय. होय, ‘पद्मावती’च्या रिलीजपर्यंत शांत राहा, स्वत:ला आवर, असे भन्साळींनी रणवीरला बजावले आहे. आता भन्साळींना रणवीरला हे का सांगावे लागतेय. तर त्याचा  अतिचंचल स्वभाव. सूत्रांच्या मते, रणवीरला सतत ‘बेफिक्रे’ मोडमध्ये असतो. कुठे थांबावे, हे अनेकदा त्याला कळत नाही. भडक कपडे आणि भडक वागणे त्याला आवडते. पण तूर्तास ‘पद्मावती’चा वाद बघता, अशास्थितीत कदाचित रणवीरकडून भन्साळींना काहीसे वेगळे अपेक्षित आहे. कदाचित रणवीरने या काळात अधिक जबाबदारीने वागावे. आपल्या दिसण्या बोलण्यातील भडकपणा त्याने जरा कमी करावा,असे भन्साळींचे मत आहे. भन्साळींचा हा सल्ला पूर्णपणे चुकीचा आहे, असे निश्चितच म्हणता येणार नाही. आता केवळ रणवीर हा सल्ला किती मनावर घेतो, ते पाहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे.

ALSO READ : तू दिसायला फार सुंदर नाहीस, असे आदित्य चोप्रा रणवीर सिंगला सांगतो तेव्हा...!

‘पद्मावती’वरून देशभर रान माजले आहे. देशभर चित्रपटाला विरोध होतो आहे. राजकीय पक्ष, अनेक राजपूत संघटना व राजस्थानातील काही राजघराण्यांनी या चित्रपटाच्या रिलीजला विरोध केला आहे. काहींनी तर थेट भन्साळींना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या चित्रपटात  राणी पद्मावतीची भूमिका साकारणाºया दीपिका पादुकोणलाही जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर चित्रपटाचे रिलीज लांबणीवर टाकण्यात आले आहे.  या चित्रपटात रणवीर पहिल्यांदा निगेटीव्ह भूमिकेत आहे. अलाऊद्दीन खिल्जीच्या भूमिकेत तो दिसणार आहे. 

Web Title: Ranveer Singh is angry with Sanjay Leela Bhansali! Pushing due to basel reading !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.